Former Mumbai cop Param Bir Singh suspended
महाराष्ट्र मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अखेर निलंबित

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सरकारने गुरुवारी निलंबित केले. परमबीर आणि आणखी एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या डीजीपींना पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंह यांच्या निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. अँटिलियाच्या बाहेर स्फोटके जप्त केल्यानंतर आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर परमबीर सिंग […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
देश

ब्रेकिंग! भारतात आढळली ओमिक्रॉनची दोन प्रकरणे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतात ओमिक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी भारतातील कोविड-19 परिस्थितीबद्दल अपडेट देताना सांगितले की देशात आतापर्यंत ओमिक्रॉनची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि दोन्ही प्रकरणे कर्नाटकातील आहेत. कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन […]

rain in maharashtra for next three days
महाराष्ट्र मुंबई

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, ‘या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी

मुंबई : सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
महाराष्ट्र

ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रॉनचे संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ (at-risk) म्हणून घोषित केले आहे. सदर विषाणूचा प्रसार महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी राज्यात हवाई वाहतूकीच्या संदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. १. […]

World AIDS Day 2021
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

जागतिक एड्स दिन 2021 : एचआयव्हीच्या संक्रमणापासून ते प्रतिबंधापर्यंत जाणून घ्या सर्व काही…

एड्स या आजाराविषयी जागरुकता पसरवण्यासाठी आणि ज्यांनी यात आपले प्राण गमावले त्या सर्वांची आठवण म्हणून दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. याची सुरुवात 1988 मध्ये झाली. जागतिक एड्स दिन 2021 ची थीम आहे – ‘असमानता संपवा. एड्स संपवा’ (‘End inequalities. End AIDS’). “मागे पडलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यावर विशेष लक्ष केंद्रित […]

depression
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

वैद्यकशास्त्राचे मोठे यश! आता एक blood test लावणार डिप्रेशनचा शोध

नैराश्यग्रस्त व्यक्तींसाठी एक अतिशय मोठी बातमी आहे. संशोधकांनी पहिल्यांदाच एक अशी रक्त चाचणी (blood test) तयार केली आहे, जी डिप्रेशनचा शोध लावू शकेल. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनने ही रक्त तपासणी लॉन्च केली आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणारे मानसोपचारतज्ज्ञ आणि अनुवांशिक शास्त्रज्ञ (जेनेटिसिस्ट)डॉ. अलेक्झांडर निकुलेस्कू म्हणाले, ‘आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की नैराश्य […]

Farmers ready to meet government on December 29
देश

शेतकरी आंदोलनामुळे एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, सरकारचे लोकसभेत उत्तर

नवी दिल्ली : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात माहिती दिली आहे की कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची नोंद कृषी मंत्रालयाकडे नाही. अशा परिस्थितीत मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वास्तविक, सरकारला लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता की आंदोलनादरम्यान किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला याची […]

lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice
अर्थकारण देश

महागाईने कंबरडे मोडले! महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा जबर फटका बसला आहे. आजपासून कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर आता उपाहारगृहातील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. व्यावसायिक सिलिंडरच्या […]

Broadcast of Dr. Babasaheb Ambedkar: The Untold Truth on December 6 on social media
मुंबई

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे ६ डिसेंबर रोजी समाज माध्यमांवर प्रसारण

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, ६ डिसेंबर २०२१ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक तसेच युट्यूब या समाजमाध्यमांवर प्रसारण होणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची निर्मिती संयुक्तरित्या केली आहे. […]

Controversy erupts in Mahavikas Aghadi over the post of Assembly Speaker
महाराष्ट्र

निवासी, आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार

मुंबई : बहुजन कल्याण विभागांतर्गत संस्थामार्फत सुरु असलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगाराच्या मुला-मुलीसाठी चालविल्या जाणाऱ्या निवासी, अनिवासी आश्रमशाळांमधील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या आश्रमशाळा १ डिसेंबर रोजी सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या […]