Chief Minister Uddhav Thackerays Orders To The Administration Regarding Corona Restrictions
महाराष्ट्र

राज्यात नवे निर्बंध लागू, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले. राज्यातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ४५० च्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू […]

Salman Khan starrer 'Veer' producer Vijay Gilani passes away
मनोरंजन

सलमान खान स्टारर ‘वीर’ चित्रपटाचे निर्माते विजय गिलानी यांचे निधन

मुंबई : यावर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. आता बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते विजय गिलानी यांच्या निधनाची बातमी आली आहे. विजय गिलानी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी सलमान खान स्टारर ‘वीर’ आणि ‘सूर्यवंशी’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. वृत्तानुसार, विजय गिलानी यांना ब्लड कॅन्सर झाला होता, त्यानंतर ते लंडनला गेले होते. […]

Nora Fatehi tests covid positive
मनोरंजन

अभिनेत्री नोरा फतेहीला कोरोनाची लागण

मुंबई : अनेक सेलिब्रिटी कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यातच आता अभिनेत्री नोरा फतेहीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर देखील तिच्या चाहत्यांना कळवले की तिची कोविड पॉझिटिव्ह चाचणी झाली आहे. तसेच नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने तिच्या वतीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. नोराची कोविड चाचणी 28 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आली […]

Approval to distribute 8 crore 50 lakh funds for "Mazhi Kanya Bhagyashree Yojana"
महाराष्ट्र मुंबई

बचतगटांच्या उत्पादनांना ‘माविम’ मार्फत ऑनलाइन मार्केटिंगचे व्यासपीठ

मुंबई : बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम असून, महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिजनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. ई- मार्केटिंगमध्ये महिला कमी पडू नयेत, यासाठी बचतगटाच्या उत्पादनांना माविममार्फत ऑनलाइन मार्केटिंगचे सर्व व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. माविम अंतर्गत बचतगटामार्फत तयार […]

Guidelines for citizens regarding 31st December and New Year
महाराष्ट्र

३१ डिसेंबर आणि नववर्ष साजरे करण्याचा विचार करताय, जाणून घ्या गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर २०२१ व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने ३१ […]

Success in closing the gate of Radhanagari Dam
कोल्हापूर महाराष्ट्र

दिलासादायक! राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश

कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. आज सकाळी साडे नऊ च्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट उघडले होते. यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढत होती. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा […]

bachpan ka pyaar fame sahdev dirdo may shift to raipur for treatment
मनोरंजन

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदोला उपचारासाठी रायपूरला पाठवण्याची तयारी, प्रकृती स्थिर

मुंबई : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदो याचा मंगळवारी अपघात झाला. या अपघातामध्ये सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहदेव दिरदोचा अपघात झाल्यापासून चाहते त्याची प्रकृती सुधारण्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. अपघातानंतर सहदेव बेशुद्धच होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा शुद्ध आली. आता सहदेवच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. सहदेवला रात्री उशिरा जगदलपूर […]

pm kisan installment latest update pm narendra modi will announce
देश शेती

ब्रेकिंग! पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता 1 जानेवारी रोजी मिळणार

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा १० वा हप्ता 1 जानेवारी रोजी रिलीज होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 10वा हप्ता 1 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जारी करतील, अशी घोषणा त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 रोजी […]

Petrol, diesel prices
देश

झारखंड सरकारची मोठी घोषणा, पेट्रोलच्या दरांमध्ये मिळणार 25 रुपयांची सवलत

झारखंड : झारखंड सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठी घोषणा केली आहे. झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने ट्विट करून सांगण्यात आले की, ‘पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सरकार राज्यस्तरावरून दुचाकी वाहनांसाठी प्रति लिटर पेट्रोलवर 25 रुपयांची सवलत देणार आहे. अहवालानुसार, स्वस्त पेट्रोल आणि डिझेलचा लाभ फक्त BPL […]

mobile service provider bharti airtel revised tariffs pre paid plans increase
गॅझेट्स तंत्रज्ञान

Airtel कडून ग्राहकांना नववर्षाची भेट, या प्रीपेड प्लॅनवर मिळेल सूट

काही दिवसांपूर्वी टेलिकॉम ऑपरेटर्सनी प्रीपेड प्लॅन महाग केले होते. मात्र आता कंपन्या नवीन वर्षापूर्वी रिचार्जवर ऑफर देत आहेत. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी एअरटेल आपल्या ग्राहकांना मोबाईल रिचार्जवर सूट देत ​​आहे. एअरटेल आपल्या अनेक प्रीपेड प्लॅनवर 50 रुपयांची सूट देत आहे. तथापि, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे Airtel Thanks अॅप असणे आवश्यक आहे. अॅपवरून प्लॅनचे सदस्यत्व […]