WHO Report : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक धक्कादायक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जगातील 99% लोक विषारी हवेच्या संपर्कात श्वास घेत आहेत. वायू प्रदूषणाचा थेट परिणाम तुमच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचत आहे, तुम्ही श्वास घेत असलेली हवा इतकी दूषित झाली आहे की ती सुधारली नाही तर श्वास घेण्यायोग्य हवाच राहणार नाही. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग! अनिल देशमुख यांना CBI ने केली अटक
मुंबई : सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली आहे. दरम्यान, CBI कोठडी टाळण्यासाठी अनिल देशमुख रुग्णालयात दाखल झाले, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला होता. कथित १०० कोटींच्या वसुली प्रकरणासंदर्भात देशमुख यांच्या कोठडीची मागणी करणाऱ्या सीबीआयच्या अर्जाला विशेष सीबीआय […]
प्रेमविवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा…
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका तरुणाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. 22 वर्षीय शुभम केशरवानी याने प्रेमविवाह केला होता, असे सांगितले जात आहे. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात मृताने पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. सुसाईड नोटच्या आधारे शुभमच्या कुटुंबीयांनी तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा […]
सलमान खानला मोठा दिलासा, पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी समन्सला 5 मे पर्यंत स्थगिती
मुंबई : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकारासोबत कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सलमानला जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी 5 मे पर्यंत स्थगिती दिली, तर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 9 मे पर्यंत वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली. दिवाणी न्यायालयाने गेल्या महिन्यात सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज […]
धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा युट्युबवर व्हिडिओ पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न
नागपूर : आजच्या काळात सगळीकडे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. दरम्यान, सोशल मीडियाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात एका अल्पवयीन मुलीने यूट्यूब पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिच्या पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वय फक्त 17 वर्षे आहे, तर तिच्या प्रियकराचे वय 27 […]
पुतण्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एड्स बाधित महिलेला अटक
उत्तर प्रदेश : 23 वर्षीय एड्स बाधित महिलेला तिच्या 15 वर्षीय पुतण्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. व्हायरसचा संसर्ग करण्याच्या उद्देशाने तिने पुतण्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी मुलाच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे महिलेला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या महिलेच्या […]
ब्रेकिंग! सरकारने ब्लॉक केले ‘हे’ 22 YouTube चॅनेल, 18 भारतीय यूट्यूब चॅनेलचा समावेश
नवी दिल्ली : सरकारकडून 22 YouTube चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत. चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. मंत्रालयाने सांगितले की अवरोधित चॅनेलची एकत्रित दर्शक संख्या 260 कोटी आहे. जम्मू आणि काश्मीर, युक्रेन आणि भारतीय लष्कर यांसारख्या संवेदनशील विषयांवर चॅनेलने खोट्या बातम्या पसरवल्या आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने […]
तर मी संपत्ती भाजपाला दान करेल… ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया…
मुंबई : ईडीने मोठी कारवाई करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन शब्दांचं ट्विट करत ते म्हणाले की असत्यमेव जयते!! त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी कष्टाने कमावलेली ईडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यानंतर ते म्हणाले की […]
ब्रेकिंग! संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई, ईडीकडून मालमत्ता जप्त…
मुंबई : ईडीने मोठी कारवाई करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर ईडीकडून त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 1,034 कोटी रुपयांच्या […]
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या, त्यांच्या घरासमोरच केला गोळीबार
नांदेड : नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या दोघांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत होते. पण उपचारादरम्यान बियाणी यांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार कुणी केला याचा पोलीस घटनास्थळी येऊन शोध घेतायत. आज सकाळी ११ वाजेची […]









