अहमदनगर : मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. केतन शशिकांत लोंढे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (गणेशा) येथे ही दुःखद घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतन नुकताच पोहायला शिकला होता. त्याची शाळा सध्या सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत असायची. शाळेतून आल्यानंतर दुपारच्या सुमारास परिसरातील आठ […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये पैसे होतील दुप्पट, मिळतील अनेक लाभ, जाणून घ्या…
पोस्ट ऑफिस सुरक्षित गुंतवणुकीसाठी खूप महत्वाचे आहे. पोस्ट ऑफिसमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक गुंतवणूक योजना आहेत. पोस्ट ऑफिस योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना हमी परतावा मिळतो. तसेच, पैसे गमावण्याची चिंता नाही. पोस्ट ऑफिसमध्ये आता ऑनलाइन जमा करण्याची सुविधा देखील सुरू झाली आहे. तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची एक अशी स्कीम सांगत आहोत, ज्यामध्ये तुमचे पैसे […]
अनिल देशमुख यांची 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी
मुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. आज कोर्टात सीबीआयचे वकील आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांमध्ये जोरदार वादावादी झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीत सीबीआयने आज अनिल देशमुखला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. आता न्यायालयाने त्यांची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी […]
मुंबईत कोरोनाच्या दोन नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले, आरोग्य विभाग सतर्क
मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती. त्यानंतर जवळपास सर्व प्रकारचे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. पण आता कोरोनाचे दोन नवीन प्रकार मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत कप्पा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आलाआहे, तर कोरोनाच्या “XE” प्रकाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाचीही ओळख पटली आहे. त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नमुने […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी करणार, आजपासून दहा दिवस ‘असे’ असणार कार्यक्रम
मुंबई : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात आजपासून (६ एप्रिल) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 6 एप्रिल ते […]
शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा
शिर्डी : शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी […]
कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी, २५ कोटी रुपयांचा निधी देणार
शिर्डी : कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी दिली असून त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज कोपरगाव येथे केली. कोपरगाव येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर या इमारतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज अजित पवार […]
येत्या ३ – ४ तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, गारपीटीची शक्यता
पुणे : येत्या ३ ते ४ तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. Thunderstorm accompanied with lightning & moderate to intense spells of rain with gusty winds […]
स्मार्टफोनचा स्फोट टाळण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि सुरक्षित राहा…
पुणे : स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण दिवसभरातील कितीतरी कामांसाठी त्याच्यावर विसंबून असतो. परंतु आपल्याला हे माहित आहे की, काहीही परिपूर्ण नसते, त्यामुळे आपण फोन वापरत असताना काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. स्मार्टफोन वापरण्याच्या बाबतीत मुख्य चिंतेपैकी एक म्हणजे स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या बातम्या वारंवार कानावर येत असतात. सुदैवाने, […]
Zomato Swiggy Down : फूड डिलिव्हरी ऍप्स Zomato आणि Swiggy तांत्रिक कारणामुळे बंद
नवी दिल्ली : फूड डिलिव्हरी ऍप्स झोमॅटो आणि स्विगी यांनी बुधवारी ‘तांत्रिक समस्यांमुळे’ देशव्यापी आउटेज नोंदवले. झोमॅटो आणि स्विगी बुधवारी दुपारच्या जेवणाच्या वेळेच्या गर्दीच्या अनुषंगाने डाउन झाले, जेव्हा ऑर्डरची संख्या सामान्यत: वाढलेली दिसते. वापरकर्ते मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर गेले आणि म्हणाले की ऍप कार्य करत नाही आणि ते ऑर्डर देण्यास अक्षम आहेत. दोन्ही कंपन्यांच्या कस्टमर केयर […]










