पुणे : काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुवर्ण-मध्य काढण्याची भूमिका घेतल्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याची संधी हातची गेली, या भावनेने काही राजकीय पक्षांचा भ्रम निरास झाल्यामुळेच हा चिथावणीखोर हल्ला झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे जाहीर निषेध व […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मुंबईनंतर गुजरातमध्ये आढळला कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा रुग्ण
नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, XE चे एक प्रकरण गुजरातमध्ये आढळून आले आहे. 11 मार्च रोजी रुग्णाची कोविड-19 साठी सकारात्मक चाचणी झाली आणि एका आठवड्यात तो बरा झाला होता. जीनोम-सिक्वेंसिंगनंतर, रुग्णाला कोरोनाव्हायरसच्या XE प्रकाराने संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तथापि, हे XE प्रकार असल्याची पुष्टी करण्यासाठी नमुन्याची पुन्हा तपासणी […]
कॅनडातील टोरंटो येथे भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या
नवी दिल्ली : कॅनडाच्या टोरंटोमध्ये एका 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या अनेक जखमा झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या तरुणाचे नाव कार्तिक वासुदेव असून टोरंटोमधील सबवे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारामुळे अनेक जखमा झालेल्या वासुदेवला ऑफ-ड्युटी पॅरामेडिककडून वैद्यकीय मदत मिळाली आणि […]
मोठी बातमी : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक, दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सुमारास शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आठ वाजेच्या सुमारास परळ येथील त्यांच्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि […]
नात्याला काळिमा! जन्मदात्या वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
नाशिक : जन्मदात्या वडिलांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वडिलांकडून होणाऱ्या सततच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने अखेर ‘११२’ क्रमांक डायल केला आणि हा संतापजनक प्रकार समोर आला. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिंचोंडी खुर्द शिवारात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने ११२ या हेल्पलाइनवर घरात भांडण झाले […]
ब्रेकिंग! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना आता खाजगी लसीकरण केंद्रांवर सावधगिरीचा डोस उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, खाजगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिलपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सावधगिरीचे डोस उपलब्ध होतील. आरोग्य मंत्रालयाने निवेदनात स्पष्ट केले आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर असावे. […]
संतापजनक! घरगुती वादादरम्यान 3 वर्षीय चिमुकलीची हत्या, जवानाचे धक्कादायक कृत्य…
पनवेल : घरगुती वादादरम्यान 3 वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. रॅपिड ऍक्शन फोर्स (RAF) अधिकारी आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरु असताना जवानाने 3 वर्षीय मुलीला भिंतीवर आदळल्याने तिचा मृत्यू झाला. खारघर पोलिसांनी 39 वर्षीय आरोपीला आपल्या 3 वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह तळोजा येथे ढिगाऱ्यात टाकल्याच्या आरोपाखाली अटक केली. मिळालेल्या […]
प्रसिद्ध गीतकार माया गोविंद यांचे निधन, सुमारे 350 चित्रपटांसाठी लिहिली गाणी
मुंबई : अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी आज मुंबईत झोपेतच अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा अजय याने या वृत्ताला दुजोरा दिला. माया गोविंद यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या आणि त्यांना युरिन इन्फेक्शनसारख्या आरोग्याच्या समस्या होत्या. माया गोविंद यांच्या पार्थिवावर दुपारी ३ नंतर पवन […]
दारूसोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, वाढतो स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका…
What Not To Eat With Alcohol : दारू पिणे आरोग्यासाठी चांगले नाही, हे तर सर्वांनाच माहित आहे. तरीदेखील अनेक जण दारू पितात. पण काही अशा गोष्टी आहेत, ज्यांचे दारूसोबत सेवन करणे घातक ठरू शकते. त्यामुळे अल्कोहोलसोबत काय खाऊ नये हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दारू पिणे यकृतापासून मूत्रपिंडापर्यंत देखील हानिकारक आहे, कारण अल्कोहोलचा त्यांच्यावर […]
महिलेने शॉवर घेताना बाथरूममध्येच दिला मुलाला जन्म, गर्भवती असल्याची कल्पनाच नव्हती…
ऑस्ट्रेलिया : एका महिलेने शॉवर घेताना बाथरूममध्येच मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे, या महिलेसाठी हा खूपच मोठा धक्का होता, कारण ती गर्भवती असल्याची त्या महिलेला कल्पनाच नव्हती. डीमिटी बोनेट (Dimitty Bonnet) या २८ वर्षीय महिलेला अगोदरच २ मुले आहेत, डिमिटी आणि तिचा पती जेसन (वय 42) यांना ती गरोदर असल्याची माहिती नव्हती. आश्चर्यजनक गोष्ट अशी […]










