महेश बाबू यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत खुलासा केला. हिंदी चित्रपटसृष्टीला मी परवडणार नाही, म्हणून हिंदी चित्रपट करण्यात वेळ घालवणार नाही, असा खुलासा त्यांनी केला. महेश बाबू सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘सरकारु वारी पेटला’च्या रिलीजची वाट पाहत आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित हा चित्रपट १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महेश बाबू यांनी अलीकडेच ओटीटीमध्ये प्रवेश […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दुःखद! तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
सोलापूर : खेळत-खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. मोहोळ तालुक्यातील शेटफळ इथे ही घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. मृत कार्तिकचे वडील मुकेश ज्योतिनाथ हिंगमीरे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊजी भरत निकम हे मोलमजुरीची कामे करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील […]
पालघरमध्ये चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
मुंबई : पालघरमध्ये चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या गळ्यात कापडाचा फास असल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. 8 मे रोजी दुपारी ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारची राहणारी 20 वर्षीय आरती कुमारी पाल रविवारी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथून […]
विश्वकर्मा विद्यापीठाकडून सोमनाथ गिते यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
पुणे : विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून श्री. सोमनाथ निवृत्ती गिते यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी (Doctorate in de-addiction study and innovation) प्रदान करण्यात आली आहे. व्यसनमुक्तीचा सखोल अभ्यास करून त्यावर नवनवीन उपाय शोधण्याचे काम त्यांनी केले, अनेकांचे समुपदेशन केले, तसेच सातत्याने लिखाण करून उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल त्यांना या उच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे. गेल्या […]
फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, दाम्पत्यावर ऍसिड ओतून हत्या केल्याचा होता आरोप
मुंबई : एका दाम्पत्यावर ऍसिड ओतून त्यांची हत्या केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका व्यक्तीची शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्याच्याविरुद्धच्या पुराव्यांमध्ये विसंगती असल्याच्या कारणावरून न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती एसएस जाधव आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की खटला अत्यंत आकस्मिक पद्धतीने चालवला गेला आणि आरोपींना दोषी […]
एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा – अजित पवार
बारामती : एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव इंजिनिअरींग कॉलेजच्या “शरद सभागृहामध्ये” आयोजित शंभर टन ऊस उत्पादन अभियान व शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान हा एक चांगला उपक्रम आहे. […]
जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट, ३ जण जखमी
झारखंड : जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला आहे. जमशेदपूर टाटा स्टील कारखान्यातील कोक प्लांटमध्ये बॅटरीमध्ये स्फोट झाल्याने भीषण आग लागली, असे सांगण्यात आले आहे. या अपघातात २ मजूर गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग आटोक्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. टाटा […]
मुंबईतील LIC कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : मुंबईत सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या आग दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इमारतीला आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग […]
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आज एलपीजी सिलेंडरमध्ये ५० रुपयांची वाढ झाली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता त्रासलेली असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे. 14.2 किलोच्या विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आजपासून 999.50 रुपये प्रति […]
जिग्नेश मेवाणी आणि रेश्मा पटेल यांच्यासह नऊ जणांना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
गुजरातच्या एका न्यायालयाने गुरुवारी वडगाम येथील विधानसभेचे सदस्य (आमदार) जिग्नेश मेवाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रेश्मा पटेल यांच्यासह नऊ जणांना जुलै 2017 मध्ये पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढल्याबद्दल बेकायदेशीर असेंब्लीसाठी दोषी ठरवले. जिग्नेश मेवाणी यांना भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 143 नुसार गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले कारण त्यांना आणि इतर आरोपींना मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात […]










