झारखंड : जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला आहे. जमशेदपूर टाटा स्टील कारखान्यातील कोक प्लांटमध्ये बॅटरीमध्ये स्फोट झाल्याने भीषण आग लागली, असे सांगण्यात आले आहे. या अपघातात २ मजूर गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग आटोक्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
टाटा स्टीलने या प्रकरणाची जबाबदारी घेत सांगितले कि, 3 कंत्राटी कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी 2 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर एक जण सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे. याचा उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही. आग नक्की कशी लागली, याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. तथापि, ज्या ठिकाणी स्फोट झाला तो प्लांट सध्या वापरात नसून तो काढून टाकण्याची प्रक्रिया सुरु आहे.
3 contract employees sustained minor injuries and were administered first aid. While 2 of them have been discharged post first aid, one is currently under medical observation. There has been no impact on production.
— Tata Steel (@TataSteelLtd) May 7, 2022




