Fire Breaks Out In Lic Office Building In Santacruz Area In Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील LIC कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : मुंबईत सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या आग दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इमारतीला आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत