मुंबई : बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातही दातांवर उपचार मिळतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दंत चिकित्सक क्षेत्राला उर्जितावस्था येण्यासाठी व धोरण आखण्यासाठी दंत परिषदेने अभ्यासगटाद्वारे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मोठा बातमी! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने राहणार सुरू, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप […]
अभिनेत्री चेतना राजचे निधन, वजन कमी करण्यासाठी केलेली सर्जरी बेतली जीवावर
बेंगळुरू : अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करतात. अशाच एका सर्जरीत कन्नड अभिनेत्री चेतना राज हिने आपला जीव गमावला आहे. कन्नड टेलिव्हिजनची ती लोकप्रिय अभिनेत्री होती. 21 वर्षीय चेतनाने बेंगळुरूच्या एका खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, चेतना राजने अलीकडेच वजन कमी करण्यासाठी बंगळुरूमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये फॅट फ्री सर्जरी करुन घेतली […]
उद्धव ठाकरेंची संघावरील टीका मनाला क्लेश देऊन गेली, शिवसैनिक श्याम देशपांडे राजीनामा देताना काय म्हणाले? जाणून घ्या…
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी संघाच्या हिंदुत्वावरून काळ्या टोपीवरही प्रश्न उपस्थित केले. मात्र, संघावर केलेली टीका पुणे शहराचे माजी प्रमुख श्याम देशपांडे यांच्या जिव्हारी लागल्यानं त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. श्याम देशपांडे हे २००० ते २०१२ दरम्यान कोथरूडमधून शिवसेनेचे नगरसेवक होते. ते […]
तीन वाहनांचा विचित्र अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर 9 जण जखमी
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. ट्रक, रिक्षा आणि क्रुझर या तीन वाहनांमध्ये रात्री १ वाजेच्या दरम्यान अपघात झाला, या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरमेपाडा याठिकाणी हा अपघात घडला. जखमींना धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]
जालन्यात खळबळ! चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा मारहाण करून खून
जालना : जालना शहरातील सोनलनगर भागात चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून भारती गणेश ऊर्फ संजू सातारे (३६) आणि वर्षा सातारे (१७) यांचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत भारती सातारे यांची बहीण पंचशीला कदम यांनी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. […]
आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात, जगताप थोडक्याच बचावले
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर संग्राम जगताप यांची बीएमडब्लू कार आणि एसटीची धडक झाली, या अपघातात संग्राम जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि कारमध्ये अत्याधुनिक सुरक्षा असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.30 […]
पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा, कार्यालयांवरही कारवाई सुरू
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांच्या घरावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त सीवागंगई आणि चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयचा हा छापा मनी लाँड्रिंग प्रकरणात टाकण्यात आला आहे. चिदंबरम यांच्या मुलावर अनेक खटले सुरू आहेत. यामध्ये INX मीडियाला FIPB (फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन […]
‘रानबाजार’ मध्ये अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज… तेजस्विनी विवस्त्र तर प्राजक्ताचा प्रणय करतानाचा सीन.. पहा व्हिडिओ
मुंबई : इंग्रजी आणि हिंदी वेब सीरिजमध्ये बोल्डनेस काही नवीन गोष्ट नाही. बोल्डनेसमुळे अनेक सीरिज चर्चेत आल्या. या सीरिजच्या यादीत आता एका मराठी वेब सीरिजचं नाव घेता येईल. या सीरिजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या टिझरची प्रचंड चर्चा आहे. या सीरिजचं नाव आह रानबाजार. रानबाजारचे दोन टिझर नुकतेच शेअर करण्यात आले. वेबविश्वाला […]
समलिंगी विवाह प्रकरण राष्ट्रीय महत्वाचा मुद्दा नाही, केंद्र सरकारचा लाइव्ह-स्ट्रीमिंगला विरोध
नवी दिल्ली : समलिंगी विवाहांना मान्यता मिळावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयासमोरील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने विरोध केला आहे. सरकारने असा युक्तिवाद केला आहे की ही बाब राष्ट्रीय महत्त्वाची नाही आणि बहुसंख्य भारतीय लोकसंख्येवर त्याचा परिणाम होत नाही. थेट प्रक्षेपण शोधण्याचा अर्जदाराचा उद्देश अविश्वासू आहे कारण तो “अनावश्यक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत […]










