धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. ट्रक, रिक्षा आणि क्रुझर या तीन वाहनांमध्ये रात्री १ वाजेच्या दरम्यान अपघात झाला, या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरमेपाडा याठिकाणी हा अपघात घडला. जखमींना धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मालेगावकडून मध्यप्रदेशकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कांद्याच्या ट्रकने समोर असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटलं आणि रिक्षा समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रूजरवर जाऊन आदळली. यात रिक्षा आणि क्रूजर गाडीचा चुराडा झाला. या विचित्र अपघातात ३ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते.
या अपघातातील मृतांची नावे :
- सरलाबाई पंडित सोनवणे (वय २९)
- रिक्षा चालक रईस शेख
- महेंद्र चुडामन पाटील (वय ५१)
जखमींची नावे :
- विद्या भूषण कानडे (वय २१)
- ताराबाई अशोक वसरे (वय ५०)
- सुपडू बारकू वसरे (वय ५५)
- कोयल प्रमोद सोनवणे (वय १२)
- सुरेश नारायण सोनवणे (वय ६०)
- प्रमोद रमेश सोनवणे (वय ४५)
- वसंत पंडित वंजारी (वय ३३)
- सुधीर अभिमान पाटील (वय ५४ )
- अरुणाबाई प्रमोद पाटील (वय ४५)