मुंबई : गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक गोविंदा पथकांची शासनाने विमा संरक्षण द्यावे अशी मागणी होती, या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत, 75 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री […]
लता दीदींच्या जयंतीदिनी 28 सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च […]
शहीद झाल्यानंतर तब्बल 38 वर्षांनी जवानाचे पार्थिव घरी पोहोचले, आज अंत्यसंस्कार
उत्तराखंड : लष्करातील जवान लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला यांचे पार्थिव त्यांच्या हल्द्वानी येथील निवासस्थानी आणण्यात आले. चंद्रशेखर हरबोला यांचे पार्थिव घेऊन लष्कराचे जवान, जिल्हा प्रशासन आणि पोलिस कर्मचारी दाखल झाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीएम धामी यांनीही शहीद हरबोला यांच्या घरी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि श्रद्धांजली वाहिली. हल्द्वानीचे रहिवासी लान्स नाईक […]
जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडित भावांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
जम्मू-काश्मीर : जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या आणखी एका क्रूर हल्ल्यात काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडण्यात आल्या, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा भाऊ जखमी झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील छोटीपोरा भागात दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेत काम करत असलेल्या दोन भावांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या […]
ब्रेकिंग! आता दूधही महागले, अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
मुंबई : गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), जे अमूल ब्रँड अंतर्गत दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करते, त्यांनी मंगळवारी सांगितले की त्यांनी बुधवार (17 ऑगस्ट) पासून दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपये म्हणजेच 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. अमूल गोल्ड दुधाची किंमत 31 रुपये प्रति 500 मिली, अमूल ताजा 25 रुपये प्रति 500 […]
अल्पवयीन मुलीवर भावानेच केला बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर मुलीचे प्रियकरावर आरोप… अखेर अशाप्रकारे सत्य समोर
मुंबई : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची आई पीडीतेला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन आली असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सत्र न्यायालयात आणि बाल न्याय मंडळासमोर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या मित्राला अटक केली होती. मात्र, डीएनए चाचणीत वेगळेच […]
बीसीसीआयचे माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे निधन
झारखंड : बीसीसीआयचे माजी कार्यकारी सचिव आणि झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे (जेएससीए) अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. निवृत्त वरिष्ठ IPS अधिकारी, जे झारखंड पोलिसात IGP पदापर्यंत पोहोचले, माजी सर्वोच्च पोलिस झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) चे अध्यक्ष देखील होते. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा […]
ब्रेकिंग! जवानांची बस दरीत कोसळून भीषण अपघात, 6 ITBP जवान शहीद तर 32 जण जखमी
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात ITBP जवानांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 39 कर्मचारी घेऊन जाणारी सिव्हिल बस ब्रेक निकामी झाल्याने नदीच्या काठावर पडली. यात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (इतबाप) चे 37 आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या 2 जणांचा समावेश आहे. या अपघातात तब्बल 6 ITBP जवानांचा मृत्यू झाला असून सुमारे 32 जण जखमी झाल्याची […]
दुर्गम भागातील व्यथा! गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात जुळ्या बाळांचा मृत्यू
पालघर : एका गर्भवती महिलेला वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने नवजात जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न समोर आला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथील वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी झोळीतून तीन किलोमीटर अंतरावरील दवाखान्यात […]










