delhi police special cell arrested pakistani isi trained terrorist
देश

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडित भावांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीर : जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या आणखी एका क्रूर हल्ल्यात काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडण्यात आल्या, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा भाऊ जखमी झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील छोटीपोरा भागात दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेत काम करत असलेल्या दोन भावांवर गोळीबार केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या काश्मिरी पंडिताचे नाव सुनील कुमार असे असून त्यांच्या भावाचे नाव पितांबर आहे. पितांबर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्यानंतर सुनील कुमार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही भाऊ बिगर स्थलांतरित होते आणि दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला तेव्हा ते त्यांच्या वडिलोपार्जित ठिकाणी राहत होते, असे अहवालात म्हटले आहे. काश्मीरमधील बिगर स्थलांतरित पंडितांवर २४ तासांतील हा दुसरा हल्ला आहे. स्वातंत्र्यदिनी, जम्मू आणि काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांनी करण कुमार सिंग यांच्या घरावर ग्रेनेड फेकल्याने ते जखमी झाले.

गेल्या काही महिन्यांपासून जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, ज्यामध्ये खोऱ्यातील काश्मिरी पंडित आणि इतर नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हत्येविरोधात काश्मिरी पंडितांनी जम्मूमध्ये निदर्शने केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत