a youth died
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

दुःखद! अग्निवीर भरतीमध्ये चाचणीदरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू, औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद : अग्निवीर भरतीमध्ये मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान औरंगाबादमध्ये घडली. करण नामदेव पवार (वय- २०, रा. विठ्ठलवाडी, सिर्जापूर, ता. कन्नड, जि औरंगाबाद) असे मृत तरुण उमेदवाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील करण आणि सागर हे दोन सख्खे भाऊ अग्निवीर भरतीसाठी […]

15-year-old student shot at while returning home from coaching
क्राईम देश

कोचिंगमधून घरी परतताना 15 वर्षीय विद्यार्थिनीवर गोळीबार, CCTV फुटेज आले समोर

बिहार : पाटण्यात एका 15 वर्षीय विद्यार्थिनीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता या घटनेचे CCTV फुटेजही समोर आले आहे. या फुटेजमध्ये आरोपी विद्यार्थिनीला पाठीमागून गोळी मारताना दिसून येत आहे. मुलगी समोर येऊन एका गल्लीत वळताच अचानक आरोपीने आपल्या पिशवीतील पिस्तूल बाहेर काढून तिच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी […]

Boat Found At Raigad Seashore Ak 47 Rifle And Ammunition Recovered
महाराष्ट्र मुंबई

रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळली, हाय अलर्ट जारी

रायगड : रायगडमधील समुद्रकिनाऱ्यावर एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली आहे. बोटीमध्ये शस्त्रे सापडल्याचे वृत्त आहे. एका मच्छिमाराने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. त्याचवेळी बोटीत शस्त्रे सापडल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळली आहे. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल […]

Govt blocks 22 YouTube channels for spreading disinformation
तंत्रज्ञान देश

ब्रेकिंग! केंद्र सरकारने केले 8 YouTube चॅनल ब्लॉक, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कारवाई

नवी दिल्ली : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार केल्याप्रकरणी 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. या YouTube चॅनेलमध्ये 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान आधारित YouTube चॅनेलचा समावेश आहे. […]

Comparing ED and CBI with dogs Sanjay Raut tweeted a caricature
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, राऊतांकडे असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावे

मुंबई : ईडीने बुधवारी मुंबई उपनगर परिसरात छापे टाकले. मुलुंडच्या एका कार्यालयावर छापा टाकण्यात आला तेव्हा मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त करण्यात आले. यात संजय राऊत वापरत असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावाने घेण्यात आल्या असल्याचं समोर आलं. याप्रकरणी आता ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहे. संजय राऊत आणि श्रद्धा डेव्हलपर्स […]

Drug racket busted : drugs worth Rs. 2435 crore seized in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलिसांनी तब्बल 2,435 कोटी रुपयांचे ड्रग्ज केले जप्त, 7 आरोपींना अटक

मुंबई : मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात कारवाई सुरूच असून अँटी नार्कोटिक्स सेलने छापा टाकून 2,435 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दोन आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. हे संपूर्ण प्रकरण याच वर्षी २९ मार्चचे आहे, जेव्हा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील गोवंडी भागात […]

Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
महाराष्ट्र मुंबई

विनायक मेटे यांच्या अपघाताची CID चौकशी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाच वेळा विधानपरिषद आमदार राहिलेले विनायक मेटे भाजपसोबत युतीमध्ये होते. विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण कार अपघातात निधन झालं. दरम्यान, मेटे यांची […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र शैक्षणिक

MPSC आणि CET दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली, चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा

मुंबई : एमपीएससी आणि सीईटी या परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र यंदा २१ ऑगस्ट रोजीच दोन्ही परीक्षा असल्याने नक्की कोणती परीक्षा द्यावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यार्थी एमपीएससी आणि सीईटी अशा दोन्ही परीक्षांसाठी मेहनत घेत असतात. दरम्यान या परीक्षेच्या संदर्भात आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

Farmers
देश

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, मिळणार स्वस्त कर्ज आणि व्याजात 1.5% सूट

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. अल्पमुदतीच्या कर्जांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज मिळेल. एवढेच नाही तर मंत्रिमंडळाने व्याज सवलत योजनाही जाहीर केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजात 1.5 टक्के सूट मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीसाठी 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे त्यांना […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के महागाई भत्ता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल, त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च […]