Chandrakant Patil
महाराष्ट्र शैक्षणिक

MPSC आणि CET दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली, चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा

मुंबई : एमपीएससी आणि सीईटी या परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र यंदा २१ ऑगस्ट रोजीच दोन्ही परीक्षा असल्याने नक्की कोणती परीक्षा द्यावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यार्थी एमपीएससी आणि सीईटी अशा दोन्ही परीक्षांसाठी मेहनत घेत असतात. दरम्यान या परीक्षेच्या संदर्भात आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींसाठी मोठी घोषणा केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की एमपीएससी आणि सीईटी या दोन्ही परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तारीख बदलण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी या सीईटी (CET) च्या सेलला संपर्क करण्यास सांगण्यात आलं आहे. ज्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांना सीईटी (CET) परीक्षेसाठी तारीख बदलून घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांनी त्वरित सीईटी कक्षात email द्वारे अवगत करावे, असे पाटील यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत