नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 84 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 42 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अखेरचा निरोप! विनायक मेटे यांच्यावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीडमध्ये अंत्यसंस्कार
बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीड येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवाई रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव औरंगाबाद व त्यानंतर बीडला नेण्यात येईल. अंत्यविधीसाठी राज्यभरातील कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसंग्रामच्या नेत्यांनी दिली. दरम्यान, मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन, देशाच्या विकासासाठी ‘हे’ 5 संकल्प
नवी दिल्ली : आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली. आज भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, वीर सावरकर, राम मनोहर लोहिया आणि इतरांसह स्वातंत्र्य […]
दुःखद! शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं भीषण अपघातात निधन
मुंबई : माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. आज मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती, त्याच बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे येत होते. बीडमध्ये आज मोठा कार्यक्रम असतानाही समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, हे प्रमाण मानून त्यांनी बीडमधला कार्यक्रम सोडला आणि मुंबईच्या […]
ब्रेकिंग! ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख
मुंबई : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथे दाखल करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. झुनझुनवाला हे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांनी त्रस्त होते, त्यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु ते बरे झाल्यानंतर घरी […]
तिरंगा फडकवण्याआधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक, जाणून घ्या…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. आजपासून (१३ ऑगस्ट) या मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी घर किंवा ऑफिसच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याआधी ‘हर घर तिरंगा‘ च्या ऑफिशियल साईटवर जा. होम पेजवर PIN A […]
प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाने केली स्वतःच्या आईची हत्या
हरियाणा : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाने आपल्याच विधवा आईचा चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाने आईची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला आणि तिचा मोबाईल घेऊन पळ काढला. पोलिसांनी आरोपी मुलाला रोहतक येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आई बराच वेळ मोबाईलवर बोलत असल्याने आरोपीला वाटत होते की त्याच्या आईचे कोणाशी […]
ब्रेकिंग! दिल्लीत मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळला, रुग्णालयात उपचार सुरु
दिल्ली : दिल्लीत शनिवारी मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आफ्रिकन वंशाच्या महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही एक 22 वर्षीय आफ्रिकन महिला असून तिचा नायजेरियाच्या प्रवासाचा इतिहास आहे. ही महिला दक्षिण दिल्लीत राहत होती. मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यानंतर तिला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी आलेल्या अहवालात मंकीपॉक्सची पुष्टी […]
लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला, 20 सेकंदात 10 ते 15 वेळा वार
न्यूयॉर्क : लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी न्यूयॉर्क राज्यातील एका कार्यक्रमात चाकूने वार करण्यात आले. आरोपी स्टेजवर धावत गेला आणि त्याने रश्दी यांच्यावर 20 सेकंदात 10 ते 15 वेळा चाकूने वार केले. शहरापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या चौटौका इन्स्टिट्यूशनमध्ये ही घटना घडली. प्रेक्षकांमधील एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, हल्लेखोराने काळा मुखवटा घातलेला होता. “आम्हाला […]
ब्रेकिंग! सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे, याबाबत पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. जयराम रमेश यांनी ट्विट केले, “काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची आज कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सरकारी प्रोटोकॉलनुसार आयसोलेशनमध्ये राहतील.” Congress President Smt.Sonia Gandhi has tested […]










