मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
शेतकऱ्यांच्या पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीतील विसंगती करणार दूर
मुंबई : कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीमध्ये विसंगती दूर करून दिलासा देण्यात येईल. हा कृषी क्षेत्रातील व्यवसाय असून त्यानुसार ठराविक एकसमान दराने कर आकारण्यासाठी कार्यवाही केली जावी, अशा सूचना महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. कुक्कुट पालकांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. […]
मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
नवी दिल्ली : मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 18 हजार 036 कोटी रुपये असून, तो सन 2028-29 पर्यंत […]
पुण्यात भीषण अपघात; १० वाहने एकमेकांना धडकली, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहनांचे मोठे नुकसान
पुणे : पुण्यातील वारजेमध्ये विचित्र अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील वारजेमध्ये १० वाहने एकमेकांना धडकली आहेत. या विचित्र अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंबई-बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील वारजेजवळील हैदराबाद बिर्याणीसमोर दहा वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. परंतु […]
करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रायगड : रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदर उभारणीचे कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी 153 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय याठिकाणी अत्याधुनिक अशी जेटी तयार करण्यात येणार असून, हे बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
चुकूनही खाऊ नका कच्ची अंडी, अन्यथा शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम…
पुणे : अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. अनेक व्यक्तींना सकाळी नाश्त्यात अंडी खायला आवडतात. अंड्यांचा वापर ऑम्लेट, करी, भुर्जी, रॅप्स, टोस्ट, मऊ उकडलेले, सँडविच, मफिन्स आणि इतर अनेक मिष्टान्न करण्यासाठी देखील केला जातो. तर काही लोकांना मात्र कच्चे अंडे खायला आवडतात. पण कच्ची अंडी आरोग्यासाठी चांगली आहेत का? हे जाणून घेऊया… तज्ञांच्या मते, […]
बांधकामावर पाणी मारताना विजेचा धक्का लागून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
नाशिक : बांधकामावर पाणी मारताना विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. मंगेश प्रवीण राणे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सातपूर भागात विद्युत तारा भूमिगत करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ही दुःखद घटना घडली आहे. सात माऊली चौकात राहणारा मंगेश प्रवीण राणे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घराचे बांधकाम चालू […]
चिंताजनक! यंदा मान्सून परतण्यास होणार उशीर, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता
मुंबई : यंदा मान्सून वेळेवर आला आणि पाऊसही चांगला पडला. पण आता मान्सून वेळेवर न परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कमी दाबाची प्रणाली तयार झाल्यामुळे, यावेळी मान्सून परतण्यास उशीर होणार आहे. हा कालावधी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्याहूनही पुढे जाऊ शकतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. साधारणतः सप्टेंबरच्या […]
द्राक्षपिकांना शेतमालाचा दर्जा, विमासंरक्षण, नुकसान भरपाई व अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रालयात बैठक, कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश
मुंबई : द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषीमालाच्या यादीत करण्यासंदर्भात नाबार्डसह अन्य संबंधीत यंत्रणांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द व्हावा यासाठी पूर्वप्रक्रिया पूर्ण करुन केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र लिहिण्यात येईल. अवेळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी द्राक्ष व फळबागांनाही प्लॅस्टीक आच्छादनांसाठी अनुदान मिळावे यासाठी राष्ट्रीय […]
व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, अनेकींचे नग्न व्हिडिओ… अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
मल्याळी चित्रपटांच्या चित्रीकरण सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे लावून अभिनेत्रींचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनी शनिवारी केला. तसेच, पुरुष कलाकार असे व्हिडीओ त्यांच्या मोबाइलवर पाहत असताना आपण स्वत: पाहिले असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मल्याळी चित्रपटसृष्टीत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाशी संबंधित न्या. के. हेमा समितीचा अहवाल […]










