Eating raw eggs will have serious effects on the body
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

चुकूनही खाऊ नका कच्ची अंडी, अन्यथा शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम…

पुणे : अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. अनेक व्यक्तींना सकाळी नाश्त्यात अंडी खायला आवडतात. अंड्यांचा वापर ऑम्लेट, करी, भुर्जी, रॅप्स, टोस्ट, मऊ उकडलेले, सँडविच, मफिन्स आणि इतर अनेक मिष्टान्न करण्यासाठी देखील केला जातो. तर काही लोकांना मात्र कच्चे अंडे खायला आवडतात. पण कच्ची अंडी आरोग्यासाठी चांगली आहेत का? हे जाणून घेऊया…

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तज्ञांच्या मते, अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 9, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि सेलेनियम सारखे आवश्यक पोषक असतात. याव्यतिरिक्त, त्यात ओमेगा -3, फॅटी ऍसिडस्, DHA आणि EPA सारख्या निरोगी चरबी देखील असतात. यामुळेच अंड्याचा पिवळा भाग खाण्याऐवजी काही लोक प्रथिनांसाठी अंड्याचा इतर भाग खातात.

तज्ज्ञांच्या मते, आपल्या शरीराच्या विविध कार्यांसाठी चरबी आवश्यक असते. अंड्यांमध्ये आढळणारी असंतृप्त चरबी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. अंड्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. परंतु, कच्चे अंडे खाण्याबाबत आपण काळजी घ्यायला हवी. कच्च्या अंड्यांमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

  • कच्ची अंडी आरोग्यासाठी चांगली असतात, असा समज आहे. परंतु, जठरांत्रीय आजारांची जोखीम असल्यामुळे लोकांना कच्चे अंडे न खाण्याचा सल्ला दिला जातो.
  • काही लोक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कच्चे अंडे रिकाम्या पोटी खातात. ज्यामुळे पोटदुखी, गॅस, पेटके, जुलाब, बद्धकोष्ठता, सूज येणे यासारख्या अनेक पचन समस्या उद्भवू शकतात.
  • तसेच कच्च्या अंड्यांना तीव्र वास असल्यामुळे उलट्या किंवा मळमळ जाणवते.
  • उकडलेल्या अंड्यांपेक्षा कच्ची अंडी पचायला जड असतात आणि त्यामुळे सूज आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्या उद्भवू शकतात.
  • तज्ञांच्या मते, दररोज 1 कच्चे अंडे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर खूप ताण येतो. कारण त्यामुळे शरीराला साल्मोनेलासारख्या बॅक्टेरियाशी लढावे लागते.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत