मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये […]
पुणे : आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्यामुळे चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आईने केला वेगळाच बनाव
पुणे : आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्यामुळे एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेदांश वीरभद्र काळे असे मृत मुलाचे नाव असून महेश कुंभार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत मुलाच्या आईने मुलगा बेडवरुन पडल्याचे सांगत त्याला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र पोलीस तपासात हे धक्कादायक सत्य […]
पुणे : 30 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून, भावाला वाचवण्याचा करत होता प्रयत्न
पुणे : आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. मृत व्यक्तीच्या भावाचे हल्लेखोरांसोबत पूर्ववैमनस्य असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी मुख्य हल्लेखोरासह दोघांना अटक केली आहे, ज्यांच्यावर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव सुनील सरोदे (वय […]
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू […]
भयंकर मृत्यू! कामगार फोम मिक्सरच्या आत करत होते साफसफाई, तेवढ्यात ऑपरेटरने सुरु केले मशीन…
पुणे : मशीन ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर अन्य एक कामगार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पुण्यापासून 18 किमी अंतरावर असलेल्या वडकी नाला परिसरात स्नूझ हब कम्फर्ट नावाच्या मॅट्रेस निर्मिती युनिटमध्ये ही घटना घडली. मॅट्रेस कारखान्यात दोन कामगार मशीनची आतून साफसफाई […]
पिडीत महिला व बालकांच्या संरक्षणासाठी नवीन कायदे, गुन्हेगारांवर बसणार वचक…
मुंबई : महिला व बालकांच्या संरक्षणासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अत्याचारग्रस्त पीडित महिलांच्या संरक्षणासाठी गुन्हेगारांवर ‘कायद्याचा धाक’ राहणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने 1 जुलै 2024 पासून नवीन कायदे अंमलात आणले आहेत. या कायद्यांतील विविध कलमांन्वये महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिला व बालकांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचे पाठबळ मिळणार […]
मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावेत, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या […]
खळबळजनक! विवाहितेवर तीन मित्रांकडून वारंवार अत्याचार, पीडितेच्या आत्महत्येनंतर झाला धक्कादायक खुलासा…
सोलापूर : एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी वारंवार अत्याचार करून तिला शारिरिक आणि मानसिक त्रास दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना जीवे मारू, अशी धमकी देखील या नराधमांनी तिला दिली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरून […]
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, एक जण वाहून गेला, पालकमंत्र्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा
नांदेड : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. एक जण वाहून गेला तथापि, नांदेड […]








