4-year-old boy brutally beaten to death by mother’s lover
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्यामुळे चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आईने केला वेगळाच बनाव

पुणे : आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्यामुळे एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेदांश वीरभद्र काळे असे मृत मुलाचे नाव असून महेश कुंभार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत मुलाच्या आईने मुलगा बेडवरुन पडल्याचे सांगत त्याला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र पोलीस तपासात हे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची आई पल्लवी काळे ही अप्पर बिबवेवाडी परिसरात वास्तव्यास होती. मात्र, तिच्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती मुलगा वेदांशसह तिच्या प्रियकरासोबत राहत होती. तिचे नाशिकमध्ये राहणाऱ्या महेश कुंभार (वय 25) याच्याशी प्रेमसंबंध होते.

पोलीस तपासात असे दिसून आले की 1 सप्टेंबर रोजी नाशिकमधील पंचवटी येथे कुंभार याच्या घरी असताना रात्री 11 वाजता रात्रीचे जेवण केल्यानंतर मुलाने उलटी केली. त्यामुळे रागाच्या भरात कुंभारने चिमुकल्याला हाताने आणि झाडूने बेदम मारहाण केली. या निर्दयी मारहाणीनंतर मुलगा बेशुद्ध पडला. त्यानंतर कुंभार आणि मुलाच्या आईने त्याला नाशिकच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना दुसरे खासगी रुग्णालय रेफर केले. पण त्याऐवजी कुंभार आणि पल्लवीने मुलाला पुण्यात आणले आणि २ सप्टेंबरला सकाळी पुण्यातील पीएमसी संचालित कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पल्लवीने हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, वेदांश सकाळी 6 च्या सुमारास झोपेत बेडवरून पडल्याने बेशुद्ध झाला होता. पल्लवीने पोलिसांना सांगितले की हे घडले तेव्हा ती घरी नव्हती आणि जेव्हा ती कामावरून परतली तेव्हा मुलाच्या डोक्याला दुखापत झालेली होती आणि तो प्रतिसाद देत नव्हता. मात्र, या चिमुकल्याच्या अंगावर इतर दुखापतीच्या खुणा होत्या, पल्लवीने सांगितले की ते १५ दिवसांपूर्वी लोणावळ्याला गेले होते तेव्हा टेरेसवरून पडल्यामुळे त्याला मार लागला होता. मुलाच्या शवविच्छेदनात अहवालात त्याचा मृत्यू डोक्याला अनेक जखमा झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

पुणे शहर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे की, मुलाचा मृत्यू त्याने उलटी केल्याच्या रागातुन त्याला बेदम मारहाण केल्यामुळे झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी चालक म्हणून काम करणाऱ्या कुंभार याचा शोध सुरू केला. फोन डेटासह तांत्रिक माहितीच्या आधारे, पुणे शहर पोलिसांनी कुंभारचा शोध घेतला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी त्याला  नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पल्लवीवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्ह्यातील तिच्या भूमिकेची नाशिक पोलिसांकडून चौकशी केली जाईल आणि ते तिच्यावर पुढील कारवाई करतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत