म्युकरमायकोसिस : म्युकरमायकोसिस ज्याला सामान्यतः काळी बुरशी म्हणतात, हा एक गंभीर आणि दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे. नाकाच्या आजुबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. प्रतिकारशक्ती कमी असल्यास ती वेगाने वाढते. ही बुरशी पुढे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करते. हे इन्फेक्शन जबडा, दात, डोळे आणि कधी-कधी मेंदूपर्यंत पसरते.
हे संक्रमण म्यूकोर्मिसेट्स नावाच्या बुरशीच्या गटामुळे होते. हे वातावरणात सर्वव्यापी आहेत आणि बर्याचदा अन्न कुजताना ती दिसते. वातावरणात सामान्य असूनही, याचा मानवांमध्ये संसर्ग शक्यतो होत नाही, कारण आपल्या रोगप्रतिकारक पेशी अशा रोगजनकांशी सहजपणे लढा देऊ शकतात. मात्र आता भारतातील अशक्त रूग्णांमध्ये मेंदूवर आक्रमण करणार्या काळी बुरशीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातच आपल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला असताना ही समस्या डोकं वर काढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
हा आजार कोणाला होऊ शकतो?
म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमी आहे, ज्यांना मधुमेह, किडनीचे आजार आहेत, ज्यांचे ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले आहे, तसेच जे बराच काळ ICU मध्ये उपचार घेत होते, त्यांना हा आजार होण्याची भीती असते. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे आजवर या आजाराचे रुग्ण क्वचित आढळायचे. मात्र, आता कोरोनानंतर त्यात वाढ होताना दिसत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरच या आजाराचे रुग्ण दिसू लागले होते. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर ते वाढले आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण जास्त आहे. तेथे कोरोनासाठी देण्यात येणारी औषधे, मधुमेह व कोरोनामुळे कमी झालेली प्रतिकारशक्ती, ही त्याची कारणे असू शकतात.
संक्रमण कसे सुरू होते आणि कसे वाढत जाते?
केंद्र सरकारने एका ऍडव्हायझरी मध्ये म्हटले आहे की या आजाराचा संसर्ग प्रामुख्याने अशा लोकांना प्रभावित करत आहे, जे अशा औषधांवर आहेत ज्यामुळे पर्यावरणीय रोगजनकांशी (environmental pathogens) लढा देण्याची क्षमता कमी होते.
श्वास घेताना हवेमधून या बुरशीचे बीजाणू शरीरात प्रवेश करतात आणि व्यक्तीच्या सायनस किंवा फुफ्फुसांवर परिणाम करतात. काळजी न घेतल्यास म्युकरमायकोसिस प्राणघातक होऊ शकते.
या आजाराची लक्षणे आणि निदान :
म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्यांशी संबंधित लक्षणे दिसत आहेत. त्यात डोळ्यांना सूज येणे, लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यांतून पाणी येणे. गालांवर सूज येणे, अन्न चावताना दात दुखणे, ही या आजाराची लक्षणे आहेत. चेतावणी देणाऱ्या लक्षणांमधे डोळे आणि नाकाभोवती वेदना आणि लालसरपणा, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, रक्ताच्या उलट्या आणि बदललेली मानसिक स्थिती यांचा समावेश आहे.
कोरोना रुग्ण ज्यांना मधुमेह आहे किंवा रोगप्रतिकार शक्ती खूपच कमी आहे, अशा व्यक्तींमध्ये चेहर्याच्या एका बाजूच्या वेदना किंवा चेहर्यातील अस्थिपोकळीत वेदना, नाक किंवा टाळूच्या ठिकाणी काळसरपणा, दातदुखी, डोळ्यांना वेदनेसह अस्पष्ट किंवा दुहेरी प्रतिमा दिसणे, त्वचेवर जखमा, छातीत दुखणे आणि श्वास घेताना त्रास जाणवणे, अशी लक्षणे वाढत असल्याचे दिसत आहे.
लक्षणे आढळल्यास काय करावे?
म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारांची गरज असते. अन्यथा एक ते दोन आठवड्यांत ही बुरशी डोळे आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकते. यात जबडा, डोळा शस्त्रक्रिया करून काढावा लागू शकतो; तर प्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे कोव्हिड होऊन गेलेल्या रुग्णांनी त्यांचे तोंड व डोळे यांची तपासणी नियमित करावी. त्यातही ज्यांना मधुमेह असेल त्यांनी तातडीने तपासणी करावी.
Evidence based Advisory in the time of #COVID-19 (?????????, ????????? & ?????????? ?? ????????????) @MoHFW_INDIA @PIB_India @COVIDNewsByMIB @MIB_India #COVID19India #IndiaFightsCOVID19 #mucormycosis #COVID19Update pic.twitter.com/iOGVArojy1
— ICMR (@ICMRDELHI) May 9, 2021
म्युकरमायकोसिस कसे टाळावे?
- आपण धूळयुक्त बांधकाम साइटना भेट देत असल्यास मास्क वापरा.
- बागकाम करताना, माती किंवा खत हाताळताना शूज, लांब पायघोळ आणि लांब बाहीचे शर्ट आणि ग्लोव्ह्ज घाला.
- अंघोळ करताना स्क्रबसह संपूर्ण वैयक्तिक स्वच्छता ठेवा.
हे प्रतिबंधित करून उपचार कसे केले जातात?
प्रतिजैविक आणि अँटीफंगल औषधे योग्य प्रकारे वापरावी लागतात. हा आजार गंभीर असला तरी योग्य उपचार मदत करू शकतात. त्यासाठी लवकर निदान होणे गरजेचे असते. याच्या उपचारासाठी अँटीफंगल औषधे दिली जातात. काही वेळेला संक्रमित पेशी कापून टाकाव्या लागतात, जेणेकरून संसर्ग पसरण्यास प्रतिबंध करता येईल.
या आजारापासून बचाव करण्यासाठी, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर देखरेख ठेवली जाते, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवले जाते.





chan mahiti dili thank you stay safe
nice information sir
Khup chan lihata tumhi. Khup mahtvachi mahiti milali. Thank you.
nice information
खुप खुप आभार आपण दिलेल्या माहिती बद्दल.