अहमदनगर : शिर्डीत पाच महिन्यांच्या चिमुकलीला कोरोना होऊन गेल्यानंतर आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट (PMT) रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतक्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस झाल्याने चिंतेत भर पडली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत राहते. त्यांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांना दोन मुली असून धाकटी मुलगी पाच महिन्यांची आहे. […]
टॅग: म्युकरमायकोसिस
‘म्युकरमायकोसिस’ काय आहे? कोणाला होऊ शकतो? लक्षणे? कसे टाळावे? या आजाराविषयी जाणून घ्या..
म्युकरमायकोसिस : म्युकरमायकोसिस ज्याला सामान्यतः काळी बुरशी म्हणतात, हा एक गंभीर आणि दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे. नाकाच्या आजुबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. प्रतिकारशक्ती कमी असल्यास ती वेगाने वाढते. ही बुरशी पुढे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करते. हे इन्फेक्शन जबडा, दात, डोळे आणि कधी-कधी मेंदूपर्यंत पसरते. हे संक्रमण म्यूकोर्मिसेट्स […]


