Severe tremors in Assam Arunachal Pradesh
देश

आसाम अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; इमारतींना तडे

आसाम : आसामसह पूर्वेकडील काही राज्यांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. आसाममध्ये सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लागोपाठ दोन झटके जाणवले. त्यामुळे लोक आपापल्या घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. त्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले. एक ७ वाजून ५५ मिनिटांनी ४.३ रिश्टर स्केल, तर त्यानंतर थोड्या वेळात ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला.

अरुणाचल प्रदेशचे डीआयजीपी मधूर वर्मा यांनी भूकंपासंदर्भात ट्विट करत म्हटलं कि, “इटानगरमध्येही मोठ्या तीव्रतेचे झटके जाणवले असून, घरं पूर्ण हादरली होती. जवळपास ३० सेंकट भूकंपाचे झटके जाणवले. कुठलीही जीवितहानी झाली नसून, सर्वांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.”

भाजपाचे आसाममधील नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनीही ट्विट करत म्हटलं कि, “आसामला भूकंपाचा मोठा झटका बसला आहे. सर्वजण सुखरूप असतील अशी मी प्रार्थना करतो आणि नागरिकांनी सतर्क राहावं. सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत आहे.” त्यांनी काही फोटोही ट्विट केले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत