Rickshaw and car accident on Karjat-Neral road
महाराष्ट्र

कर्जत – नेरळ रोडवर रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, धडकेनंतर झाला स्फोट

रायगड : कर्जत तालुक्यातील डिकसळमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. कर्जत – नेरळ रोडवर झालेल्या या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि एक मुलगा यांचा समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या अपघातानंतर कर्जत ते नेरळ रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. धडकेनंतर स्फोट झाला आणि दोन्ही वाहने पूर्णतः जळून खाक झाली. यापैकी एक वाहन CNG असल्याने स्फोट होऊन दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती तात्काळ अग्निशामक दलाला देण्यात आली, त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत