Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement wont cut power coneection
पुणे महाराष्ट्र

मोठी बातमी : पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याच्या मागणीला अजित पवार यांचा विरोध

पुणे : पुण्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावायचे की लॉकडाऊन करायचे याचा निर्णय आजच्या आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. माहिती मिळत आहे की प्रशासनाने पुण्यात १ ते १४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली. मात्र, अजित पवार यांनी या मागणीला विरोध केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. दर दिवशी ६ हजारांच्या पुढे ही रुग्णवाढ गेली आहे. यातल्या अनेक जणांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्या जात आहेत. यातल्या अनेक लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळा आयसीएमआरचे निर्बंध पाळतात का याची तपासणी केली जाणार आहे. पुण्यात नेमके किती कोरोना पॅाझिटिव्ह आहेत याचा आढावा आता घेतला जाणार आहे. खासगी प्रयोगशाळेकडून दिल्या जाणाऱ्या अहवालाची स्वतंत्र तपासणी आता केली जाणार आहे. आजच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत