Shreyas Iyer subluxated his left shoulder
क्रीडा

श्रेयस अय्यरला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी लागणार मोठा कालावधी, IPL मधून बाहेर

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबतचे नवे अपडेट आले आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आता मिळालेल्या नवीन अपडेटनुसार, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या हंगामात श्रेयस खेळू शकणार नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या फक्त पहिल्या सत्रात नाही तर पूर्ण स्पर्धेतून बाहेर होणार आहे. खांद्याच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी त्याला किमान सहा आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. जर शस्त्रक्रिया करावी लागली तर जास्त कालावधी लागेल. त्याला नेट्समध्ये परत येण्यास किमान चार महिने लागण्याची शक्यता आहे. आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. श्रेयस दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. श्रेयसच्या गैरहजेरीत दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंत, स्टीव्ह स्मिथ अथवा आर अश्विनकडे सोपवले जाऊ शकते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत