Grandfather sentenced to life imprisonment for abusing 11-year-old granddaughter
महाराष्ट्र

11 वर्षीय नातीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा

यवतमाळ : आजोबाने 11 वर्षीय नातीवरच अत्याचार केल्याची संतापजनक घटना घाटंजी तालुक्यात घडली होती. या गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012 (पोक्सो) प्रमाणे आरोपी आजोबाला सक्तमजुरीसह आमरण जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाला होता. ती लहान बहिणीसह वडिलांसोबत राहत होती. तिचे आजोबा मारेगाव तालुक्यातील एका गावात राहत होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने पीडित मुलगी आणि बहिण आजोबांकडे राहायला गेल्या. तिथे आजोबाने वारंवार पीडितेवर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगू नकोस म्हणून तिला धमकी दिली. काही दिवसांनी पीडित मुलगी पुन्हा वडिलांकडे राहायला आली. मात्र दुर्दैवाने काही दिवसातच तिचे वडील मरण पावले. त्यामुळे तिचे आजोबा तिच्याच घरी येऊन राहायला आले. तिथेही या आजोबाने नातीवर वारंवार अत्याचार केले. यातूनच पीडितेला गर्भधारणा झाली.

आजोबाने धमकावल्यामुळे पीडितेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, 15 ऑगस्टच्या दिवशी शाळेच्या झेंडावंदन कार्यक्रमामध्ये पीडिता शाळेत चक्कर येऊन पडली. तेव्हा तिच्या आजीने आणि गावचे सरपंच यांनी तिची विचारपूस केली. तेव्हा तिने आजोबाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले आणि हे प्रकरण उघडकीस आले.

22 ऑक्टोबर 2019 रोजी पीडिता मुलीच्या आजीने (आईची आई) घाटंजी पोलिस ठाणे येेथे या संदर्भात तक्रार दिली. आरोपी आजोबा तिच्या वडिलांचा वडील आहे. या प्रकरणात सात साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, तिची आजी व वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष महत्वाची ठरली. जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिउद्दीन यांनी आरोपीस सक्तमजुरीसह आमरण जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत