Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र महिला विशेष मुंबई

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यातील पैसे या तारखेला मिळणार, मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

मुंबई : लाडकी बहीण योजनेचे १ ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी ३१ ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी १ ऑगस्टपासून या योजनेत ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना पैसे मिळणार आहे. सध्या ऑगस्ट महिन्याच्या अर्जांची छाननी सुरु आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ४५ ते ५० लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत