Know, why dry run of corona vaccine is important?
कोरोना देश

कोरोना लस 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

मुंबई : आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींचा या लसीकरणात समावेश आहे. सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रावर शुल्क घेऊन लस दिली जाईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सरसकट कोरोना लस दिली जाणार नाही तर यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःदेखील एक मार्चपासून ऑनलाइन नोंदणी करू शकता. Co-Win अॅप 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.  को-विन (Co-Win), आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅप या मोबाइल अॅपच्या माध्यमातून किंवा cowin.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करता येईल. ऑनलाइन नोंदणी करताना सर्वात आधी तुमचा मोबाइल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला अकाऊंट तयार करण्यासाठी ओटीपी मिळेल. यानंतर तुमचं नाव, वय, लिंग आणि आवश्यक ओळखपत्रं अपलोड करा.

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल पण तुमचं वय 45 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला इतर आजार असेल तर तुम्हाला असलेल्या आजाराचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल. तुम्हाला मोबाइल अॅप किंवा ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या सेवा केंद्रांवर जाऊन तिथं आपली नोंदणी करू शकता किंवा 1507 या क्रमांकावर कॉल करून नोंदणी करा. जर यापैकी कुठेच तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं शक्य झालं नाही तर तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन तुम्हाला तिथं नोंदणी करता येईल. यावेळी तुम्हाला सोबत ओळखपत्र आणि वयाचा पुरावा सोबत न्यावा लागेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत