Pune Police Employee suicide found dead in home
पुणे महाराष्ट्र

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाना हंडाळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून काम करत होते. ते शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये डी इमारतीत राहत होते. त्यांना एक मुलगी आहे. नाना हंडाळ यांनी शुक्रवारी संध्याकाळी 4 ते 7 च्या दरम्यान कुटुंबीय बाहेर गेल्यानंतर गळफास लावून घेतला. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत