क्रूड ऑइलचा भाव कमी झाल्याने आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे. आज देशभरात पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे.
काल बुधवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये १८ पैसे आणि डिझेलमध्ये १७ पैशांची कपात केली होती. दोन दिवस झालेल्या दर कपातीनंतर पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैसे स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
आजच्या दर कपातीनंतर :
- मुंबईत पेट्रोलचा भाव ९७.१९ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८८.२० रुपये झाला आहे.
- दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.७८ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८१.१० रुपये झाला आहे.
- चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.७७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.१० रुपये भाव आहे.
- कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.९८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.९८ रुपये झाला आहे.
- बंगळुरात पेट्रोल ९३.८२ रुपये असून डिझेल ८५.७४ रुपये झाला आहे.