खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राणा दाम्पत्यांनी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यामुळे नवनीत राणा व रवी राणा रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच त्यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला.





लोक प्रतिनिधीला लोक सुज्ञ समजून निवडून देतात. त्यांनी कमीत कमी नेतृत्व करण्यापूर्वी या देशाचे संविधान अभ्यासून घ्यावे. त्यामुळे त्यांच्या कडून चूकीची विधाने करण्याचे प्रमाण कमी होईल. कोणत्याही एकाच घटनेचा तपास डोळ्यासमोर ठेऊन आपण देशपातळीवरील एखाद्या तपास यंत्रणा निर्बंधित करून काय साध्य करता ? हा लोकशाहीचा सन्मान आहे का ? आपणास अधिक उमज आहे. परंतू लोकांना थोडेफार समजते.