LK Advani admitted to 'AIIMS' hospital
देश

लालकृष्ण अडवाणी ‘एम्स’ रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली…

नवी दिल्ली : भाजपचे दिग्गज नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना ‘एम्स’मध्ये अॅडमिट करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर देखरेख केली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथील खाजगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. युरॉलॉजी अर्थात मूत्रविकारासंबंधी आजारांवर डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांना नेमका कसला त्रास होत आहे, याविषयी माहिती मिळालेली नाही.

लालकृष्ण अडवाणी यांना एम्स नवी दिल्ली येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत असे एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिक तपशील न देता सांगितले. अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वयोमानापरत्वे जडलेल्या आरोग्याच्या समस्यांवर ते उपचार घेत असल्याची माहिती आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत