काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन अशा अनेक निर्णयांना लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयातील नव्या नोकर भरतीवरील स्थगितीवर भाष्य केलं आहे.
राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारचा विचार ‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ असा आहे. कोव्हिड फक्त निमित्त आहे. मोदी सरकारला सरकारी कार्यालयांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांपासून मुक्त करायचं आहे. त्यांना युवकांचं भविष्य खराब करुन आपल्या मित्रांनाच पुढे न्यायचं आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं कि, देशातील 12 कोटी रोजगार गेले आहेत. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कुठेच दिसत नाही. सामान्य नागरिकांचं उत्पन्न गायब आहे, देशाचा विकास आणि सुरक्षा देखील गायब आहे, प्रश्न विचारले तर उत्तरं गायब आहेत.
? 12 करोड़ रोज़गार गायब
? 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था गायब
? आम नागरिक की आमदनी गायब
? देश की खुशहाली और सुरक्षा गायब
? सवाल पूछो तो जवाब गायब।#विकास_गायब_है— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 4, 2020




