mahendra singh dhoni retirement BCCI
क्रीडा

धोनीने का घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय?

धोनीने तडकाफडकी आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला, असे त्याच्या चाहत्यांना वाटते. परंतु बीसीसीआयने धोनीला या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्का दिला होता. या धक्क्यातून धोनी सावरू शकला नव्हता. त्यामुळे धोनीने अखेर १५ ऑगस्टला आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

धोनी गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, त्यानंतर धोनी आतापर्यंत मैदानात खेळताना दिसला नाही. बीसीसीआयने १६ जानेवारीला या वर्षातील पुरुष क्रिकेटपटूंच्या करारांची घोषणा केली. यामध्ये धोनीचे नाव वगळण्यात आले होते. त्यावेळीच बीसीसीआयने धोनीला निवृत्ती घेण्याचा इशारा दिला होता, असे म्हटले जाते.

बीसीसीआयने करारामध्ये स्थान न दिल्यामुळे धोनी निराश झाला होता. या धक्क्यातून तो सावरू शकला नाही. त्यावेळी रांची येथील आपल्या जवळच्या मित्रांना धोनीने विचारले होते की, ” मी क्रिकेट खेळण्यासाठी फिट नाही का, मला बीसीसीआयने आपल्या करारामध्ये स्थान का दिले नाही?” पण त्याचवेळी बीसीसीआयने असे का केले, याची जाणीव झाली होती. त्यानंतरच धोनी आपल्या निवृत्तीचा विचार करायला लागला होता. पण तरीदेखील आपल्याला भारताकडून ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा धोनीला होती. त्यामुळेच धोनी फिट राहण्यासाठी प्रयत्न करत होता.

यानंतर आपण दोन वर्षांपूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती, असेही धोनी त्याच्या जवळच्या मित्रांना सांगत होता. पण बीसीसीआयने करारातून वगळल्याबद्दल धोनीला वाईट वाटले होते. यामुळेच धोनीने अखेर १५ ऑगस्टला आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत