corona booster dose
देश

महत्वाची बातमी! बूस्टर डोससंदर्भात महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सरकार लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या समितीने शिफारस केली आहे. NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीची शुक्रवारी बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा लाखांहून अधिक लोकांना रशियन लस स्पुटनिक-व्ही मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ज्या लोकांनी स्पुटनिक-व्हीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना या लसीचा पहिला डोस बूस्टर म्हणून दिला जाऊ शकतो. स्पुटनिक-व्ही लसीच्या दोन डोसच्या रचना भिन्न आहेत. रशियन लस घेतलेल्या लोकांसाठी बूस्टर डोस देण्याबाबत सध्या कोणताही धोरणात्मक निर्णय नाही. Co-Win पोर्टल स्पुटनिक-व्ही साठी कोणताही बूस्टर डोस पर्याय प्रदर्शित करत नाही. ज्या लोकांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये स्पुटनिक-व्ही लसीचा दुसरा डोस घेतला, त्यांना बूस्टर डोस मिळू शकला नाही.

NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीची शुक्रवारी बैठक झाली. यात या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली, यावेळी ज्या लोकांनी रशियन कोरोना लस स्पुटनिक-व्ही चे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना या लसीचा पहिला डोस बूस्टर म्हणून दिला जाऊ शकतो, अशी शिफारस करण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत