मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मंजू सिंग यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गीतकार, गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी शुक्रवारी ट्विटरवर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्यासोबत दूरदर्शनसाठी काम केलेल्या वेळेची आठवण करून दिली. स्वानंदला यांनी लिहिले कि, “मंजू जी मला दूरदर्शनसाठी स्वराज शो लिहिण्यासाठी दिल्लीहून मुंबईत घेऊन आल्या होत्या.”
मंजू सिंह जी नहीं रही ! मंजू जी मुझे दिल्ली से मुंबई लायी थी दूरदर्शन के लिए उनका शो स्वराज लिखने ! उन्होंने DD के लिए कई नायब शोज़ एक कहानी, शो टाइम आदि बनाए थे . हृषिकेश मुखर्जी की फ़िल्म गोलमाल की रत्ना हमारी प्यारी मंजू जी आपका प्यार कैसे भूल सकता है .. अलविदा ! pic.twitter.com/aKFvMJeFYF
— Swanand Kirkire (@swanandkirkire) April 15, 2022
मंजू सिंग हे भारतीय टेलिव्हिजन उद्योगातील एक अग्रगण्य नाव होते. त्यांनी स्वराज, एक कहानी, शो टाइम यासारख्या उल्लेखनीय कार्यक्रमांची निर्मिती केली. त्यांना प्रेमाने सर्वजण ‘दीदी’ म्हणायचे. त्या सात वर्षे चाललेल्या ‘खेल खिलोने’ या मुलांच्या शोची अँकर होती. मंजू सिंग हृषिकेश मुखर्जी यांच्या गोलमालमध्ये देखील दिसल्या होता, त्यांनी रत्नाची भूमिका केली होती.
मंजू सिंग यांनी त्यांच्या शोमध्ये राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी 1983 मध्ये शो टाईममधून टेलिव्हिजन निर्माता म्हणून सुरुवात केली. त्यांचा एक कहानी हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक लघुकथांवर आधारित होता. आणखी एक शो जो देशभरातील प्रेक्षकांना खूप आवडला होता तो म्हणजे त्यांची डॉक्यु-ड्रामा मालिका अधिकार, जी महिलांच्या कायदेशीर हक्कांवर आधारित होती. त्यांनी सम्यकत्व: ट्रू इनसाइट नावाचा अध्यात्मावरील शो देखील सादर केला होता.




