Famous actress Madhavi Gogte passed away
मनोरंजन

दुःखद! अभिनेत्री माधवी गोगटे यांचं कोरोनाने निधन

मुंबई : अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माधवी गोगटे यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीसह टेलिव्हिजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माधवी कोरोनातून बऱ्या होत होत्या, परंतु, अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर काल दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. मराठी अभिनेते सुनील तावडे यांनी फेसबुकवर त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, “भावपूर्ण श्रद्धांजली माधवी गोगटे

मराठीसह अनेक हिंदी मालिकांमधून देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. याशिवाय अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ या मालिकेमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. त्यांनी या मालिकेत अनुपमाच्या आईचं पात्र साकारलं होतं. तर सध्या त्यांची ‘सिंदुर की कीमत’ ही हिंदी मालिका ‘दंगल टीव्ही’वर सुरु होती. अभिनेते मेहुल निसार यांनी पोस्ट शेअर करत त्याला कॅप्शन दिले, “शॉक..! सुन्न..! अविश्वसनीय..! माधवीजी आम्हाला सोडून गेल्या..! RIP

 

View this post on Instagram

 

A post shared by Mehul Nisar (@mehulnisar)

माधवी गोगटे यांनी रंगभूमीवरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह ‘गेला माधव कुणीकडे’ तसेच ‘अंदाज आपला आपला’, ‘भ्रमाचा भोपळा’ ही त्यांची काही गाजलेली नाटकं. त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीकडे वळल्या. माधवी ‘घनचक्कर’ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत दिसल्या. याच चित्रपटानं त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘सत्वपरीक्षा’ या चित्रपटात त्यांनी काम केले. सूत्रधार चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत त्यांनी भूमिका साकारली होती. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत