मुंबई : मोबाइल सेवा प्रदाता भारती एअरटेलने प्रीपेड प्लॅन्सवरील दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. एअरटेलने प्रीपेड प्लॅनवर टॅरिफ दर 25 टक्क्यांनी वाढवले आहेत. एअरटेलने जाहीर केलेले नवीन टॅरिफ दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील.
आता एअरटेलने आपल्या ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने टॅरिफ दरात 25% वाढ केली आहे. याआधी जुलैमध्ये कंपनीने पोस्टपेड प्लानच्या किंमतीतही वाढ केली होती. आता एअरटेलच्या २८ दिवसांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत ९९ रुपयांपासून सुरू होईल. म्हणजेच या प्लॅनमध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने जुलैमध्ये ४९ रुपयांचा प्लॅन काढून टाकला होता. तथापि, हा प्लॅन एसएमएससह येत नाही.
जर तुम्हाला एसएमएस देखील हवे असतील तर तुम्हाला 149 रुपयांऐवजी 179 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तसेच हा फायदा आणि 1GB डेटासह 219 रुपयांचा प्लॅन देखील यायचा. त्याची किंमत आता 265 रुपयांवर गेली आहे.

एअरटेलच्या 598 रुपयांच्या लोकप्रिय प्लॅनची किंमतही वाढवण्यात आली आहे. हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये डेली वापरकर्त्यांना 1.५ GB डेटा दिला जातो. आता या प्लानसाठी तुम्हाला ७१९ रुपये खर्च करावे लागतील. डेटा टॉपअप आणि इतर योजनांच्या दरात 20% वाढ करण्यात आली आहे.
या प्रीपेड प्लॅनची नवीन किंमत २६ नोव्हेंबरपासून सुरू होईल. सध्यातरी रिलायन्स जिओ आणि वोडाफोनने दरवाढीची घोषणा केलेली नाही. तथापि, असे मानले जाते की या कंपन्यादेखील लवकरच त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवू शकतात.




