महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांच्याविरोधातील ‘ती’ याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, महिलेने केले होते गंभीर आरोप

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राऊत यांच्याविरोधात एका महिलेने गंभीर आरोप करत याचिका दाखल केलेली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राऊत यांनी अज्ञात व्यक्तिच्या माध्यमातून छळ केल्याचा आरोप सदर याचिकेत करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काय आहे प्रकरण?
एका महिलेने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एका व्यक्तिच्या माध्यमातून राऊत यांनी आपला छळ केल्याचं या महिलेने म्हटलं होतं. संजय राऊत यांनी आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी माणसं ठेवली होती. हेरगिरी, शिवीगाळ, धमक्या देणे आणि जीवे मारण्याचे प्रयत्न केले असे अनेक आरोप या महिलेने राऊत यांच्यावर केले होते. महिलेने याचिकेत म्हटले होते कि, “मी सन २०१३ मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि २०१८ मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. मात्र, पोलिसांनी याबाबत पुढे कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही. मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीविषयी गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दाद मागितली. तरीही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, बीकेसी-परिमंडळ ८च्या पोलिस उपायुक्तांनी त्याची दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजास्तव उच्च न्यायालयात दाद मागावी लागत आहे.” परंतु, आता न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत