father killed seven year old son police arrested
क्राईम देश

वडिलांनी केली सात वर्षाच्या मुलाची हत्या, अगोदर पाण्याच्या टाकीत फेकलं, दगड मारले आणि…

राजस्थान : राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात एका विक्षिप्त वडिलांनी आपल्या सात वर्षाच्या निरागस मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी मुलारामने आपल्या मुलाला उचलून पाण्याच्या टाकीत फेकले, त्यानंतर दगड मारून त्याला जखमी केले. या मुलाने टाकीबाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वडिलांनी टाकीचे झाकण बंद करून टाकले. त्यामुळे या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाराम याला मानसिक आजार आहे. त्याला दोन मुले आहेत. दोन वर्षापूर्वी मुलारामने त्याच्या पत्नीचा पाय तोडला होता, त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला. घटस्फोट झाल्यानंतर ती एका मुलाला घेऊन निघून गेली. दुसरा मुलगा मुलारामकडे सोपवण्यात आला होता. आरोपी कोणताही कामधंदा करत नव्हता. यापूर्वी त्याने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता.

जन्मदात्या वडिलांनी केला ९ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकीमध्ये जवळपास 6 ते 7 फूट पाणी होते. मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. आरोपी मुलारामला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

भयंकर कृत्य! महिलेने तीन किलो साखर घालून उकळलेले पाणी नवऱ्याच्या अंगावर फेकले, आणि…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत