Marathi Actor Bhushan Kadu's Wife Kadambari Passes Away Due To Corona
महाराष्ट्र मुंबई

अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांचं निधन झालं आहे. त्या ३९ वर्षांच्या होत्या. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती खालावल्यानंतर त्यांना केईएममध्ये हलवण्यात आलं होतं. तिथं तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांना एक सात वर्षांचा मुलगा आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का, चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे कोरोनामुळे निधन

छोट्या पडद्यावरील ‘कॉमेडी एक्प्रेस’मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले भूषण कडू हे त्यांच्या विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी ओळखले जातात. भूषण कडू हे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातही सहभागी झाले होते. त्यातील फॅमिली स्पेशल भागाच्या निमित्तानं भूषण यांच्यासोबत पत्नी कादंबरी व मुलगा प्रकीर्त हे देखील बिग बॉसच्या घरात दिसले होते.

हृदयद्रावक : आई वडिलांच्या भांडणात २ चिमुकल्यांचा मनाला चटका लावणारा अंत…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत