मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने पिठानी याला ड्रग्स प्रकरणात हैदराबादमधून अटक केली आहे.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने यापूर्वी सिद्धार्थ पिठानी याची अनेक वेळा चौकशी केली होती. सीबीआयने सप्टेंबर 2020 मध्ये त्याची सलग अनेक दिवस चौकशी केली होती. ड्रग्स प्रकरणात यापूर्वीही बर्याच लोकांना अटक करण्यात आली आहे.




