पुणे : सहज उपलब्धता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डॉक्टरांचे प्राधान्यकृत प्रिस्क्रिप्शन या कारणांमुळे डोलो-650 या पॅरासिटामॉलच्या ब्रँडच्या विक्रीत वाढ झाली आहेत. पॅरासिटामॉलच्या सर्व ब्रँडच्या विक्रीत निश्चितपणे वाढ झाली आहे, कारण कोविड -19 चा संसर्ग झालेल्या जवळजवळ प्रत्येकासाठी हे तापासाठी सर्वात सुरक्षित औषध आहे. मार्केट रिसर्च फर्म AIOCD-AWACS ने दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या दुसर्या तिमाहीत आणि […]
टॅग: कोरोना
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या […]
मुंबई काय राज्यापासून वेगळी आहे का? भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीत स्वत:ची निर्णयक्षमता दिसून येत नाही. महाविकास आघाडी सरकार मुंबईपुरते निर्णय करीत आहे. त्याचबरोबर सरकारने टास्क फोर्सने सुचविलेल्या सुचनांचा फेरविचार करावा, असेदेखील विखे […]
राज्यात २०२१ मध्ये कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये कौशल्य विकास विभागामार्फत २.१९ लाख जणांना रोजगार
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये २०२१ या वर्षामध्ये २ लाख १९ हजार १५६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. डिसेंबर 2021 या एकाच महिन्यात ४५ हजार […]
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, ऑक्सिजनची मागणी देखील वाढली
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यात ऑक्सिजनची मागणी देखील वाढली असून सध्या दररोज 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा होणार नसल्याचा दावा करत पुरेसा ऑक्सिजनसाठा असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ऑक्सिजनची […]
कोरोनाचा विस्फोट! इटलीहून भारतात आलेल्या फ्लाइटमधील 170 पैकी 125 जण कोरोना पॉझिटिव्ह
अमृतसर : पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटमध्ये १२५ जणांना कोरोनाची लागण झालेली असल्याचे आढळून आले आहे. या फ्लाइटमध्ये 170 लोक होते असे सांगण्यात येत आहे. या सर्व लोकांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अमृतसर विमानतळाचे संचालक व्हीके सेठ यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अगोदर हे विमान एअर इंडियाचे […]
होम आयसोलेशनसाठी केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईन्स, जाणून घ्या होम आयसोलेशनसाठी पात्र व्यक्ती कोणत्या?
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशनसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या किंवा संसर्गाची लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. होम आयसोलेशननुसार कोरोना रुग्णांना सुट्टी दिली जाईल, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान सात दिवस आणि सलग तीन दिवस […]
कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पण राज्यात तुर्तास लॉकडाऊनची गरज नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत टास्क फोर्स आणि आरोग्य खात्याची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे […]
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण
अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात […]
जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
मुंबई : जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. जॉनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हे अपडेट शेअर केले, जिथे त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले की कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तो त्याच्या पत्नीसह होम क्वारंटाइन झाला आहे. जॉन अब्राहमने इंस्टाग्रामवर चाहत्यांना आणि मित्रांना सांगितले की तो तीन दिवसांपूर्वी एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या […]










