radhakrishn vikhe patil

राज्य चालवायची धमक तर केंद्राकडे बोट का दाखवता? विखेंची ठाकरे सरकारवर टीका

अहमदनगर : केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?, असा जळजळीत सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होतं का?, असा […]

अधिक वाचा
first installment of GST compensation

जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी

नवी दिल्लीः  केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]

अधिक वाचा
NCP rohit pawar

जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा- रोहित पवार

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील आता जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याची मागणी केली आहे. जिम, रेस्टॉरंट आणि क्लास चालक योग्य काळजी आणि दक्षता घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. ”कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत […]

अधिक वाचा
congress rahul gandhi

‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ हा मोदी सरकारचा विचार- राहुल गांधी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन अशा अनेक निर्णयांना लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयातील नव्या नोकर भरतीवरील स्थगितीवर भाष्य केलं आहे. राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारचा विचार ‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ असा आहे. कोव्हिड फक्त […]

अधिक वाचा
HAL shares offer for sale

भारताचं पहिलं लढाऊ विमान ‘तेजस’ बनवणाऱ्या एचएएल मधील 15 टक्के भागीदारी सरकार विकणार

तेजस हे भारताचं पहिलं स्वदेशी लढाऊ विमान बनवणारी कंपनी एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडचा 15 टक्के भाग विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीच्या या भागभांडवलाची विक्री होणार आहे. या माध्यमातून सरकारला 5 हजार कोटी रुपये मिळतील अशी शक्यता आहे. ऑफरची फ्लोअर प्राईस कंपनीच्या 1001 रुपये प्रति इक्विटी शेअरवर निश्चित करण्यात आली […]

अधिक वाचा

कोरोनावरील लसीचे पहिले ५० लाख डोस सैन्याला देण्याचा सरकारचा विचार

भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात ५० लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष लसीचं पुरवठा साखळी आणि वितरणावर आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची […]

अधिक वाचा

बैरुत स्फोटांमुळे लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांचा संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा

लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी बैरुत स्फोटांमुळे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिला, त्यामुळे आठवडाभरात सरकार पायउतार झालं आहे. पंतप्रधान हसन दियाब यांनी सोमवारी (१० ऑगस्ट) संध्याकाळी देशाला संबोधताना सरकार पायउतार होत असल्याची घोषणा केली. बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ लेबनॉनमध्ये सरकारविरोधात मोठया प्रमाणावर निदर्शने, आंदोलने सुरु झाली. तिथल्या सरकारविरोधात जनक्षोभ वाढला. पंतप्रधान हसन दियाब यांच्या राजीनाम्याआधी […]

अधिक वाचा
chief minister uddhav thackeray

कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. सर्वजण मिळून काम करत आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. सुशांत सिंह राजपूत […]

अधिक वाचा