शेतकरी आंदोलनाच्या 67 व्या दिवशी शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर 2 फेब्रुवारी रोजी सरकार शेतकऱ्यांशी 13 व्या फेरीची बैठक घेणार आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास सदैव तत्पर आहे. 22 जानेवारी रोजी शेतकर्यांना दिलेला प्रस्ताव अद्याप अबाधित […]
टॅग: farmers protest
कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे, त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले – राष्ट्रपती
नवी दिल्ली : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये चालणार आहे. पहिलं सत्र 15 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती म्हणाले की, “कोरोना महामारीच्या काळात होणारं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन वर्ष आणि […]
मोठी बातमी : आंदोलनातील शेतकरी 29 डिसेंबरला सरकारला भेटायला तयार, पण..
सरकारच्या चर्चेसाठीच्या पत्रावर शनिवारी शेतकर्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांनी चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारला 29 डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे. परंतु, असे म्हटले आहे की हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याची शक्यता आणि किमान समर्थन किंमत (MSP)ची कायदेशीर हमी वाटाघाटीच्या अजेंड्यामध्ये असणे आवश्यक आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ही […]
वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा – सर्वोच्च न्यायालय
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली. यावेळी शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. तर दुसरीकडे न्यायालयानं आंदोलन मुलभूत अधिकार असला, तरी इतरांना त्रास व्हायला नको, असे निर्देश दिले. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्ते बंद असून, त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत काही जणांनी याचिका […]
सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, संत बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येवर राहून गांधींची प्रतिक्रिया
शीख संत बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने “क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत” त्यांनी तातडीने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत. राहुल यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘करनालच्या संत बाबा रामसिंह यांनी कुंडलीच्या सीमेवर शेतकर्यांची अवस्था पाहून […]
काहीही झालं तरीही कृषी कायदा रद्द होणार नाही – चंद्रकांत पाटील
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले कि, “शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही राहणार नाही.” यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं […]
प्रकाशसिंह बादल यांनी केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध करत ‘पद्मविभूषण’ सन्मान केला परत
केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला ‘पद्मविभूषण’ सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण […]







