नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]
टॅग: corona
अभिनेता सूरज थापर ICU मध्ये दाखल, मालाडमधील रुग्णालयात उपचार सुरु
नवी दिल्ली : अभिनेता सूरज थापर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मुंबईतील सर्व शूटिंग बंद असल्यामुळे सूरज थापर ‘शौर्य और अनोखी’ या मालिकेच्या शूटिंगसाठी दररोज मुंबई- गोवा प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज यांना तीन दिवसांपासून हलका ताप येत होता. सूरज थापर गोव्याहून मुंबईला परत आले तेव्हा त्यांची तब्येत अचानक […]
कोरोनाचा लहान मुलांमध्ये वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार असल्याचं […]
ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचं कोरोनाने निधन, पंतप्रधानांनी केलं दुःख व्यक्त
ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचं आज (७ मे) कोरोनामुळे निधन झालं. शेष नारायण सिंह यांच्यावर ग्रेटर नोएडामधील जीआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. कालच त्यांना प्लाझ्मा थेरपी देखील देण्यात आली होती, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. आज सकाळी त्यांचं निधन झालं. शेष नारायण सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरचे होते. गेली अनेक वर्षे ते […]
कोरोनाला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन हा एकच पर्याय, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी..
भोपाळ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांमध्ये स्थिती गंभीर होत चालली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देशव्यापी लॉकडाउनची मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात ऑक्सिजन, औषधं आणि इतर साहित्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हटले कि, आता देशव्यापी लॉकडाउन हा एकच पर्याय उरला आहे. एका वर्षापेक्षा जास्त काळ – […]
महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार […]
‘अपराजिता’ फेम अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनाने निधन
अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, कोविडसंबंधित गुंतागुंत वाढल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अखेर त्यांचे निधन झाले. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे (CINTAA) सरचिटणीस अमित बहल यांनी श्रीप्रदा यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अभिनेत्री श्रीप्रदा यांनी अभिनेता गोविंदा, धर्मेंद्र, विनोद खन्ना आणि रवी […]
राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन
मुजफ्फरनगर : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. कोरोना झाल्यानंतर गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २0 एप्रिल रोजी अजित सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना […]
‘बापमाणूस’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन
मुंबई : अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्यावर चार दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, परंतु काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिलाषा पाटील काही दिवसांपूर्वी चित्रीकरणासाठी बनारसला गेल्या होत्या. परंतु त्यांना ताप आल्यामुळे त्या मुंबईला परतल्या, त्यानंतर कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचं […]
सांगलीनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढणारी रूग्णसंख्या आणि प्राणवायू आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता आज सकाळी तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं कि, “जिल्ह्यामध्ये सद्धा ऑक्सिजनची गरज वाढत […]










