Police Commemoration Day
देश

पोलीस स्मृती दिन : करोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचारी शहिद

गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त दिल्लीतील ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’वर श्रद्धांजली अर्पण केली. करोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती यावेळी  अमित शहा यांनी दिली आहे. आत्तापर्यंत एकूण ३५ हजार ३९८ पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहेत. हे स्मारक केवळ विटा, दगड आणि सिमेंटनं बनलेलं स्मारक नाही तर हे स्मारक […]

The number of corona patients
कोरोना देश

दिलासादायक : देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट

देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. तसेच कोरोनामधून बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५५,७२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर देशात ५७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आता ७ लाख ७२ हजार ५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, […]

Rapid Corona Test
इतर कोरोना

5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना टेस्ट विकसित – ऑक्सफोर्डच्या संशोधकांचा दावा

ब्रिटिश शास्त्रज्ञांनी 5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना व्हायरस टेस्ट विकसित केली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रॅपि़ड अँटिजन टेस्टपेक्षा ही तीनपट वेगवान आहे. ऑक्सफोर्डच्या टीमला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीला डिवाइसची तयारी सुरु करण्यात येईल. त्यानंतर मंजूर केलेले डिवाइस सहा महिन्यांनंतर उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर अखिलस कापानडिज यांनी सांगितलं की, […]

Indian women's cricket team star bowler Mansi Joshi
क्रीडा

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज मानसी जोशीला कोरोनाची लागण

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज मानसी जोशीला कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मानसी आता दुबईत खेळवण्यात येणाऱ्या महिला टी20 चॅलेंजमध्ये सहभागी होणार नाही. 27 वर्षीय मानसी जोशीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ती सध्या देहराडूनमध्ये क्वॉरंटाईन आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील इतर खेळाडू 13 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, […]

Congress leader Ghulam Nabi Azad
देश

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना करोनाची लागण

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी त्यांची करोना चाचणी करावी. तसेच सरकारी नियमांचे पालन करावे” असं आवाहनही त्यांनी केलं आहे. I have tested […]

The number of corona patients
कोरोना

शंभर दिवसानंतर पुन्हा होऊ शकतो करोना

भारतात करोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच रुग्ण एकदा करोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर त्याला १०० दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे, आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली. बलराम भार्गव म्हणाले कि, “भारतात करोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे. […]

maharshtra CM Uddhav Thakarey
कोरोना महाराष्ट्र

पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना पाहुणा जात नाही आहे. हातपाय पसरत आहे. शहरातून ग्रामीण भागात पसरतोय. परत लॉकडाऊन करावा लागेल असे आपल्याला वागायचे नाही. मानवी त्वचेवर व्हायरस 9 तास राहतो. त्यामुळं नको तिथे हात लावू नका, तोंडाला लावू नका आणि सतत हात धुवत रहा. […]

health minister rajesh tope
कोरोना महाराष्ट्र

नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा- राजेश टोपे

लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत. तसंच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करू. कोरोना विषाणूवर अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. आपल्याला काही नियम आणि शिस्त ही […]

WHO
कोरोना ग्लोबल

या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता- WHO

जगभरात सध्या सर्वजण कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीची वाट पाहत आहेत. जगभरातील अनेक देशांतील संशोधकही कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. डब्लूएचओचे अध्यक्ष टेड्रोस एडहानॉम यांनी कोरोना महामारीसंदर्भात सुरु असलेल्या एका बैठकीत बोलताना सांगितले की, आम्हाला आशा […]

Second-Presidential-Debate
ग्लोबल

ट्रम्प करोनामुक्त झाले नसतील तर दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळायला हवी- जो बायडेन

ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले असले तरी ते करोनामुक्त झाल्याचं अद्याप सांगण्यात आलेलं नाही. तसेच, ट्रम्प अद्याप करोनामुक्त झाले नसतील तर दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळली पाहिजे, असं मत जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे. मंगळवारी बायडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “अनेक जण करोनाबाधित होत आहेत. ही एक गंभीर समस्या आहे. मला क्लेवलँड क्लिनिकच्या […]