मुंबई: शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांसाठी कांदा साठवणीची मर्यादा सध्याच्या २५ टनावरून वाढवून १०० टन करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे बुधवारी पत्राद्वारे केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारने कांद्याचा साठा करण्यावर निर्बंध लागू केले आहेत […]
टॅग: BJP
पंजाबमध्ये सहा वर्षाच्या बालिकेला बलात्कारानंतर जाळण्याच्या घटनेवर कॉंग्रेस शांत का?- निर्मला सीतारमण
पंजाबमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या शांततेवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटनेबद्दल राज्य सरकारला घेरणाऱ्या कॉंग्रेसला भाजपने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी पंजाबमधील होशियारपूरमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर केलेल्या अमानुषतेचा निषेध केला आणि […]
‘रात गयी, बात गयी’ म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संपवला ‘तो’ विषय
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालं होतं. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी तेच बघायचं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, “चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून […]
हे मोदीजींच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं वक्तव्य – संजय राऊत
सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच भाजपानं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. भाजपानं करोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली, याच मुद्यावरून भाजपावर जोरदार टीका होत असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले कि, “जिथे जिथे भाजपाचं सरकार नाही, तिथे करोनाची लस […]
शेवटच्या क्षणापर्यंत दोर तुटलेला नाही असं वाटत होतं, पण.. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
मुंबई : एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. माझा पक्षावर कधीच राग नव्हता, देवेंद्र फडणवीसांनी आपल्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं. गेल्या काही वर्षांपासून पक्षात होणारा अमपान आणि राजकारण यामुळे अखेरीस आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं. खडसेंच्या राजीनाम्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. […]
भाजपला राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : भाजपला राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले आहेत. एकनाथ खडसे म्हटले , कोणीही माझ्या राजीनाम्याची चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी […]
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया..
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. एकनाथ खडसे यांनी सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली असून त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान खडसेंच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हटले, खडसेंच्या राजीनाम्याविषयी […]
एकनाथ खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी “ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना” अशा शब्दात त्यांना भावनात्मक साद घातली. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार […]
मोठी बातमी: भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, राष्ट्रवादीत प्रवेश करणार: जयंत पाटील
मुंबई : भारतीय जनता पक्षाला आज (बुधवार) एक मोठा धक्का बसला आहे. कारण की, त्यांचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. जयंत पाटील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला […]
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
उस्मानाबाद : राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे हा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. फडवणीस सध्या पूरग्रस्त ठिकाणांचा दौरा करत असून यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि करोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा […]









