It is not good to break Shiv Sena, Nitin Gadkari's big statement about political crisis in the state
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शिवसेना तुटणे चांगले नाही, नितीन गडकरी यांचे राज्यातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य…

मुंबई : नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की शिवसेनेचे तुटणे चांगले नाही. ते म्हणाले की, राजकारण हा खेळ आहे, सरकार बनते आणि नष्ट होते. येथे त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या प्रसिद्ध विधानाची पुनरावृत्ती केली की लोक येतात आणि जातात, सरकार येतात आणि जातात, ते पंतप्रधान होतात आणि नंतर ते निघून जातात […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही, चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती

मुंबई : शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. भाजपाच्या निर्णय प्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्यांची कोअर […]

Sanjay Raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान आता खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. मोबाईलवरुन, व्हॉट्सअॅपवरुन तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या […]

bjp leader nilesh rane slams ncp chief sharad pawar over supporting sambhajiraje in rajya sabha election
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भूमिका बदलली नाही आणि शब्द पाळला तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा ऐनवेळी मागे घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे होणारच होते. पवार साहेब आणि शब्द पाळला, असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या […]

ed raids shiv sena mp bhavana gawli educational institutions
महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने टाकले छापे

वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण नऊ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. त्यात भावना गवळींच्या पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी सुरु असून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. भाजपा […]

Attempt to burn Shiv Sena MLA Sanjay Gaikwad's car
महाराष्ट्र

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार जाळण्याचा प्रयत्न

बुलडाणा : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टू व्हीलरवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. संजय गायकवाड रात्री दीड वाजता मुंबईहून घरी परत आले. त्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास टू व्हीलरवर आलेल्या अज्ञात […]

Shiv Sena Nashik Corporator Satyabhama Laxman Gadekar
कोरोना नाशिक महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेने लढवय्या नेत्या गमावल्या; नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]

kangana ranauts reaction on sachin waze arrest
महाराष्ट्र

…तर महाराष्ट्र सरकार कोसळेल, सचिन वाझे अटक प्रकरणावर प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने सचिन वाझे अटक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने या प्रकरणावरून शिवसेना आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे अटक प्रकरणाचा योग्य तपास केला तर सत्य बाहेर येईल आणि शिवसेनेचं सरकार कोसळेल, असं तिने ट्विट करत म्हटलं आहे. कंगना रनौतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “या प्रकरणात एक मोठं कारस्थान […]

Sanjay Raut's cautious reaction to Sanjay Rathore's resignation
महाराष्ट्र

हे राज्य सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती

मुंबई : सचिन वाझे यांच्यावरील कारवाईनंतर राजकारणात देखील त्याचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ‘हिरेन प्रकरणातील गुप्त माहिती सगळ्यात आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मिळाली, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत,’ असंदेखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. […]

Sanjay Rathore
महाराष्ट्र

संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पोहोचलाच नाही

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कायदेशीरपणे संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत. दरम्यान, संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे […]