मुंबई : महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, या वर्षीचा प्रतिष्ठित पुरस्कार देशभरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ शिल्पकार आणि महाराष्ट्र पुत्र राम सुतार यांना देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी राज्य सरकारकडून दिला जातो, आणि यंदाचा पुरस्कार राम सुतार यांच्या कलेच्या अप्रतिम योगदानासाठी त्यांना […]
टॅग: महाराष्ट्र न्यूज
जालना शहरालगतच्या शासकीय जमिनीवरीलअतिक्रमणाची सखोल चौकशी करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : जालना शहरलगतच्या शासकीय जमिनीवर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात मा. उच्च न्यायालयात उपलब्ध असलेला पाठक समितीचा अहवाल उपलब्ध करून घेतला जाईल. या अहवालातील वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत सदस्य अर्जुन खोतकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, या ठिकाणच्या […]
बेकायदेशीर होर्डिंग्जवर कडक कारवाई करणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
मुंबई : बेकायदेशीर होर्डिंग्जच्या समस्येबद्दल उत्तर देताना, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले की या समस्येवर उपाययोजना केल्या जातील. राज्य विधानसभेत अलिकडेच झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात, सामंत यांनी खुलासा केला की बेकायदेशीर होर्डिंग्ज ओळखण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण केले जाईल आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सामंत यांनी विधानसभेत माहिती दिली की विविध महानगरपालिकांतर्गत १,०३,००० हून […]
राज ठाकरे गरजले, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. जोशींच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं असं जाहीर आव्हानचं त्यांनी दिलं […]
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, एकनाथ खडसे स्पष्टच बोलले
जळगाव: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केली गेली आहे. छेडछाड झाल्यानंतर रक्षा खडसे थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत. काही टवाळखोर मुलांनी तिच्या मनाविरोधात फोटो काढले. छेडछाड करणाऱ्या चार मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतच इतर मुलींची देखील छेडछाड केली असल्याचे रक्षा खडसे […]
वाल्मीक कराडनेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आदेश दिले, ‘सीआयडी’ने आरोपपत्रात केले अनेक धक्कादायक खुलासे
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी ‘सीआयडी’ने बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा वाल्मीक कराडच सूत्रधार होता व अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणातून देशमुख यांचा खून झाल्याचे तपासात उघड झाल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा ‘सीआयडी’द्वारे तपास […]
पुण्यात खळबळ! स्वारगेट स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिह्न
पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार आज (२६ फेब्रुवारी) पहाटे साडेपाच वाजता घडला, जेव्हा पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट स्थानकावर आली होती. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या तरुणाने तिला फसवून स्वारगेटवरील शिवशाही बसमध्ये बसवले. त्यानंतर, आरोपीने बसचा […]
एकनाथ शिंदेंनंतर आता भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी
बुलढाणा : भाजपाच्या एका महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याची घटना ताजी असतानाच बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना थेट पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या निवासस्थानी हे धमकीचे पत्र पाठवण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार […]
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकषांमध्ये कोणताही बदल नाही, मंत्री अदिती तटकरे यांनी केले स्पष्ट
पुणे : महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विरोधकांचे दावे फेटाळून लावत, त्यांनी सांगितले की छाननी प्रक्रिया अनेक महिन्यांपासून सुरू असून ती निवडणुकीनंतर सुरू करण्यात आली नव्हती. तटकरे यांनी खुलासा केला की पडताळणी दरम्यान, ऑगस्टमध्ये ७५,००० आणि सप्टेंबरमध्ये […]
भिवंडीत भंगार गोदामांना भीषण आग, 15 गोदामं जळून खाक
ठाणे : भिवंडी शहरातील अवचित पाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकूण 15 भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत. या भंगार गोदामात कापड, चिंध्या, पुठ्ठे, प्लस्टिक, तागे, पीओपी आणि इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. या आगीचे नेमके कारण समजले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी […]